Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंचं आंदोलन पोलिसांकडून चिरडण्याचा प्रयत्न; महिला आयोगाने संतप्त होत थेट..

Delhi Wrestler Protest: महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Delhi Wrestler Protest
Delhi Wrestler ProtestSarkarnama
Published on
Updated on

Delhi : दिल्लीत आज नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमागात पार पडला. मात्र, दुसरीकडे महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी कुस्तीपटूंचा तंबूही हटवला असल्याची माहिती समोर आली आहे.

Delhi Wrestler Protest
Wrestler Andolan Delhi : 'विनेश तू तर माझ्या कुटुंबातीलच…' काँग्रेसने शेअर केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' व्हिडीओ : कुस्तीपटूंवरुन राजकारण तापले

पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचंही समोर आलं आहे. या प्रकारावरून आता दिल्ली महिला आयोगानेही संतप्त होत दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

महिला आयोगाने पत्रात म्हटलं की, बृजभूषण सिंह यांना पोलिसांनी अटक करावं, तसेच कुस्तीपटूंना ताब्यात घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाने केली आहे.

Delhi Wrestler Protest
Rahul Gandhi Tweet : 'अहंकारी राजा जनतेचा आवाज चिरडून टोकतोय' ; राहुल गांधींचं टीकास्त्र !

स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, "जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचं पाहून महिला आयोगाला खूप दुःख झालं. एका अल्पवयीन मुलीने खासदारावर लैंगिक छळाचा आरोप करून देखील दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत त्यांना अटक केली नाही. हा घोर अन्याय नाही तर काय आहे?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"महिला कुस्तीपटूंना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. जबरदस्तीने त्यांना ताब्यात घेत तेथून नेले. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर ओढले ते अशोभनीय आहे, असून दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांची तात्काळ सुटका करावी, तसेच बृजभूषण सिंह यांना तातडीने अटक करावी", असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com