Sextortion Call To Minister : केंद्रीय मंत्र्यांना फसवण्यासाठी 'सेक्सचं जाळं'; कटातील दोघांना अटक!

Sextortion Call To Union ministers pralhad Patel : "पोलिसांनी सापळा रचला."
Sextortion Call To Minister Pralhad Patel
Sextortion Call To Minister Pralhad PatelSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजप नेते, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री प्रल्हाद पटेल यांना 'सेक्सटॉर्शन' करणाऱ्या टोळीने लक्ष्य केले आहे. पटेल यांना एक व्हिडिओ करून अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला. हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बदनामी करण्याच्या हेतूने आरोपींनी ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी पटेल यांना दिली. मात्र या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Sextortion Call To Union ministers pralhad Patel)

Sextortion Call To Minister Pralhad Patel
Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'वर; मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू

दिल्ली पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली आहे. पटेल यांचे स्वीय सहाय्यक आलोक मोहन यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत. या टोळीचा म्होरक्या मोहम्मद साबीर हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Sextortion Call To Minister Pralhad Patel
Kirit Somaiya Viral Video : ''...नाहीतर तुमचाही सोमय्या होईल!''; विधानभवनात नेते, आमदारांमध्ये कुजबूज

आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सापळा रचला होता :

प्रल्हाद पटेल यांनी त्यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मध्य प्रदेशला जात असताना व्हॉट्सअॅपवर कॉल आल्याचे त्यांनी सांगितले. कॉल उचल्यावर अश्लील व्हिडीओ सुरू झाला. या कॉलनंतर पुन्हा एक व्हॉईस कॉल आला आणि बदनामीची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. आरोपींचे नंबर ट्रेस केले गेले. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक सूत्रांची मदत घेतली होती. ज्या फोनवरून कॉल करण्यात आला होता, तो फोनही पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

Sextortion Call To Minister Pralhad Patel
Kirit Somaiya Viral Video Update : किरीट सोमय्यांच्या 'व्हायरल व्हिडिओ'चा विषय उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच संपवला; म्हणाले..

'सेक्सटॉर्शन' म्हणजे काय?

एखाद्याला अश्लील व्हिडिओ कॉल करून तो रेकॉर्ड केला जातो. असा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडिओच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जाते. याला 'सेक्सटॉर्शन' म्हणतात. सेक्सटोर्शनद्वारे फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com