Kirit Somaiya Viral Video : ''...नाहीतर तुमचाही सोमय्या होईल!''; विधानभवनात नेते, आमदारांमध्ये कुजबूज

Monsoon Session 2023 : एरवी राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीचा ससेमिरा पाठिशी लावणाऱ्या सोमय्यांची आता मोठी पंचाईत झाली आहे.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

महेश जगताप

Mumbai : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या व्हिडिओमुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी (ता.१८) विधिमंडळात विविध पक्षाचे राजकीय नेते, आमदार यांच्यात सोमय्या यांच्या व्हिडीओबद्दल खासगीत चर्चा रंगत होती. सोमय्या यांचे नाव घेताच हास्याची लकेर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत होती. तसेच 'सावधगिरी बाळगा नाहीतर तुमचाही होईल सोमय्या...'' , अशी चर्चा विधानभवनात नेत्यांसह, आमदारांमध्ये सुरू होती.

सकाळपासूनच राजकीय नेते, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्या व्हिडिओबद्दल खासगीत विधानभवनात चर्चा रंगली होती, कोणी काढला, हे खरं आहे का? यांसारख्या अनेक प्रश्नांची मंगळवारी (ता.१८) दिवसभर विधानभवन परिसरात चर्चा रंगली होती. या व्हिडिओची अनेक राजकीय लोकांनीही धास्ती घेतली आहे. एरवी राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीचा ससेमिरा पाठिशी लावणाऱ्या सोमय्यांची आता मोठी पंचाईत झाली आहे. विरोधकांनी विधानसभेसह विधान परिषदेतही सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओंचा मुद्दा लावून धरत सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडलं.(Kirit Somaiya Viral Video)

Kirit Somaiya
Vasudev Kale : अजितदादांसारख्या बड्या नेत्यापुढे भाजपला मजबूत करणं वासुदेव काळे यांच्यापुढे आव्हान..

राजकीय वर्तुळातून सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओंवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच सोशल मीडियासह विधानभवनातही आमदारांमध्येही जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळाले. तसेच एरवी घोटाळ्यांच्या फायलींचा गठ्ठा हातात घेऊन विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात जात आव्हान देणारे सोमय्या अडचणीत आल्यामुळे काही नेत्यांना तसेच आमदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

'' अद्यापही भाजपाकडून सोमय्यांवर कारवाई नाहीच...!''

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून पुन्हा एकदा सभागृहात घणाघात टीका केली आहे. साधनसुचितेचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपाने अद्यापही किरीट सोमय्यांवर कारवाई केलेली नाही असा मुद्दा उपस्थित केला. तसेच सोमय्यांच्या जागेवर इतर सामान्य कार्यकर्ता असता तर काय झालं असतं हेही दानवे यावेळी म्हणाले.

Kirit Somaiya
Monsoon Session News : मुंबईत पावसामुळे आपत्तीजन्य परिस्थिती, विधान परिषदेचे कामकाज थांबवले..

अंबादास दानवे(Ambadas Danve) म्हणाले, मी विधान परिषदेत पेनड्राईव्ह दिला आहे. त्या पेनड्राईव्हमधील माहिती सभापती तपासतील. मी त्याची तपासणी केली आहे. सुरक्षिततेच्या आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने हे उघड करणं योग्य होणार नाही. माझ्याकडे अनेकांनी हा पेनड्राईव्ह मागितला आहे. मात्र, मी सभापती सोडून इतर कुणालाही हा पेनड्राईव्ह दिलेला नाही असंही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com