Sextortion : सेक्‍सटॉर्शन' खंडणी रॅकेट : मुख्य सुत्रधाराला राजस्थानातून अटक!

Sextortion : तरुणाने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. पुणे पोलिसांची धडक कारवाई
Sextortion
SextortionSarkarnama
Published on
Updated on

पुणे : फेसबुक, इन्स्टाग्राम, टिंडर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून, लोकांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांना बदनामीची (सेक्‍सॉटर्शन) धमकी देणाऱ्या आणि खंडणी उकळणाऱ्या राजस्थानयेथील टोळीच्या मुख्य सुत्रधाराला पुणे पोलिसांनी अटक केली. शहरातील दत्तवाडी व सहकानरगर येथील दोन तरुणांनी बदनामीच्या भितीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्‍वभूमीवर दत्तवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अन्वर सुबान खान (वय 29, रा. गुरुगोठडी, लक्ष्मणगढ, अलवर, राजस्थान) असे अटक केलेल्या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. दत्तवाडी भागातील एका तरुणाला समाजमाध्यमातून एका अनोळखी तरुणीने मैत्रीची विनंती पाठविली होती. तिने त्यास मैत्रीच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यास छायाचित्र समाजामाध्यमात प्रसारीत करुन बदनामीची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळली होती.

या घटनेनंतर तरुणाने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या पार्श्‍वभूमीवर संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या.

समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपींच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी राजस्थानातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक राजस्थानात गेले होते. तेथील गुरुगोठडी गावात सापळा रचून पोलिसांनी त्यास अटक केली.

तत्पुर्वी आरोपी व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर दगडफेक करीत त्यांच्या कारवाईला विरोध केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक अक्षय सरवटे, काशीनाथ कोळेकर, जगदीश खेडकर, अनुप पंडीत, सूर्या जाधव यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Sextortion
पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ...

गावातील अनेकजण गुन्ह्यात सहभागी :

राजस्थानमधील लक्ष्मणगढ तालुक्‍यातील गुरुगोठडी या गावातील तरुण मुले, महिला "सेक्‍सटॉर्शन'च्या नावाने देशभरातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांच्याकडूनच संबंधित तरुणांचा मानसिक छळ करुन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यातूनच पोलिसांनी अन्वर खान यास अटक केली, तेव्हा गावातील अनेकजण अशा पद्धतीने गुन्हे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Sextortion
Municipal Corporations : महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना; चार सदस्यांचा प्रभाग!

...तर पोलिसांशी संपर्क साधा :

मैत्रीच्या जाळ्यात ओढून या टोळीने देशभरातील अनेकांकडून पैसे उकळले होते. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास नागरिकांनी न घाबरता दत्तवाडी पोलीस ठाण्यात (दूरध्वनी 020 -24220201) तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com