शिंदे गटाकडून अनिल राठोडांचे शिवालय हायजॅक : 'अमृत'साठी 500 कोटींचा निधी आणणार?

दोन्ही गट आमचीच शिवसेना ( Shivsena ) खरी असा वाद घालत आहेत.
Shinde group in Shivalaya
Shinde group in ShivalayaSarkarnama

Shivsena : राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आमचीच शिवसेना ( Shivsena ) खरी असा वाद घालत आहेत. हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. असे असताना शिंदे गटाच्या अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी साडेबारा वाजता अहमदनगर शहरातील शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवालयात प्रवेश केला. तसेच हे कार्यालय आमचेच असल्याचे उपस्थित पत्रकारांना सांगितले.

शिंदे गटाने काल ( ता. 23 ) अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर केली. अहमदनगर महापालिकेतील नगरसेवक अनिल शिंदे यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची तर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे शहर प्रमुख पदाची धुरा सोपविली. पदाची पत्रे मिळताच हे पदाधिकारी आज अहमदनगर शहरात दाखल झाले. त्यांनी शिवालयात जाऊन अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे चितळे रस्त्यावरील शिवालयाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

Shinde group in Shivalaya
शिंदे गटाने नगर जिल्ह्यातील शिलेदारांची नावे केली जाहीर : राजकीय गोंधळाची शक्यता

अनिल राठोड यांचे चिरंजिव तथा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड हे सकाळी शिवालयात होते. ते सकाळी 11.30 वाजता सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमासाठी गेले. त्यानंतर शिंदे गटाने अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. तेथून शिंदे गटाचे पदाधिकारी शिवालयात आले. 'आवाज कुणाचा शिवसेनेचा', हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, अनिल राठोड अमर रहे अशा घोषणा त्यांनी देत शिवालयात प्रवेश केला. यावेळी तरळक शिवसैनिक उपस्थित होते. त्यातील कोणीही शिंदे गटाला अडविण्याचा प्रयत्न केला नाही.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवालयातील अनिल राठोड यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. शिवालया समोरच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही शिवसेनेतच आहोत. हे आमचेच कार्यालय आहे, असे त्यांनी सांगितले.

Shinde group in Shivalaya
अनिल राठोड यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी

अनिल शिंदे म्हणाले, आम्हाला अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात. पदांच्या मागण्या होत आहेत. तेथे आम्ही प्रत्यक्ष जाणार आहोत. आगामी आठ ते 15 दिवसांत जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. उत्तर जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांचे नावही लवकरच जाहीर होईल.

ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे व भाजपने हिंदुत्त्वाचा मुद्दा घेतला. त्यामुळे आम्ही हिंदुरक्षक अनिल राठोड व या शहराला अभिप्रेत असलेले हिंदुत्त्व देण्यासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला. पुढील काळात शिंदे गट व भाजप आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढविणार आहोत. शहरात हिंदुत्त्व घेऊन काम करू. मुख्यमंत्र्यांकडून शहरात विकासनिधी कसा प्राप्त होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. शहरातील रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी चांगला प्रस्ताव तयार करून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमृत पाणी योजनेसंदर्भात आयुक्तांना तातडीने प्रस्ताव करायला सांगितला आहे. अमृत योजनेसाठी 400 ते 500 कोटी रुपये शहराला मिळतील, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

Shinde group in Shivalaya
विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की; पहा व्हिडीओ

आमच्या संपर्कात बरेच नगरसेवक आहेत. शिवसेनेचे कार्यालय कुठेही जाणार नाही. अनिल राठोड हेच शिवसेनेचे कार्यालय, आम्हीही येथेच राहणार आहोत. आम्ही शिवसेनेचेच आहोत. आम्ही अनिल राठोड यांच्या हिंदुत्त्वाचे काम करायचे आहे. आम्हाला राष्ट्रवादी अथवा काँग्रेस सोबत काम करायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी दिलीप सातपुते, सचिन जाधव, सुभाष लोंढे, काका शेळके, सुरेश क्षीरसागर यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Shinde group in Shivalaya
Ajit Pawar|आमच्या घोषणा शिंदे गटाच्या जिव्हारी; अजित पवारांनी जखमेवर मीठ चोळलं...

ते काहीही म्हणत असले तरी ते खरे नाही. जनतेला माहिती आहे खरी शिवसेना कोणती आहे. शिळीने वाघाचे कातडे पांघरले म्हणून ती वाघ होत नाही. ते म्हणाले म्हणून शिवसेनेचे कार्यालय व शिवसेना त्यांची होऊ शकत नाही.

- प्रा. शशिकांत गाडे, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख, शिवसेना.

कोणी काहीही बोलू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. माजी मंत्री अनिल राठोड यांना अनेक पक्षांच्या ऑफर असूनही त्यांनी कधीही पक्ष सोडला नाही. पक्ष निष्ठा सोडणाऱ्यांना अनिल राठोड यांचे नाव घेतल्या शिवाय नगर शहरात राजकारण करता येत नाही. हे गद्दारांचे दुर्दैव आहे.

- गिरीश जाधव, नगर उपजिल्हा प्रमुख, शिवसेना.

शिवालय प्रत्येकाचे श्रद्धास्थान आहे. हिंदुधर्मरक्षक अनिल राठोड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे नगर शहरात काम केले. त्यांना नगरचा विकास अपेक्षित होता. शिवालयात प्रत्येक शिवसैनिकाला येण्याचा अधिकार आहे. जे हिंदुत्त्वासाठी, जनतेच्या कामासाठी, नगर शहराच्या विकासाठी काम करेल त्या सर्वांचे शिवालयात स्वागत आहे.

- विक्रम अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष, युवासेना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com