कामाख्या देवी पावली?,१२ माजी नगरसेवक शिंदे गटात

नाशिकच्या शिवसेना व अन्य बारा माजी नगरसेवकांच्या प्रवेशाची तयारी सुरु
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कामाख्या देवी पावणार का? याची राजकीय चर्चा घडवली जात आहेत. त्यातच विकासकामांसाठी निधीचे (Funds) आश्वासन देऊन नाशिकच्या (Nashik) बारा माजी नगरसेवकांचा (NMC corporators) प्रवेश घडविण्याची जोरदार तयारी सुरु आहे. शिवसेना, (Shivsena) भाजप (BJP) या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना त्यासाठी राजी केले जात आहे. (Nashik 12 corporators may Join Shinde group on tuesday in Mumbai)

Eknath Shinde
Uddhav Thackeray : ठाकरेंनी भरसभेत 'तो' ऑडिओ ऐकवला, फडणवीसांच्या 'त्या' मागणीची केली पोलखोल

शहरातील १२ माजी नगरसेवकांचा प्रवेश निश्चित झाला असून, २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी तारांकीत हॉटेलमध्ये जेवण, तर २९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश करण्याचे नियोजन आहे. जून महिन्यात राज्यात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांचे शिवसेनेत फूट पाडण्यासाठी सतत प्रयत्न सुरु होते.

Eknath Shinde
जाधव, गायकवाड अन् रायमुलकरांचे टेन्शन वाढले; खासदार, आमदार गेले तरी ठाकरेंनी सभा गाजवली

पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये शिंदे गटाला फारसे यश मिळाले नाही. खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे त्यांच्या व्यतिरिक्त स्ट्रॉँग असा नेता शिंदे गटात सहभागी झाला नाही.

सत्तेत येऊन चार महिने संजय गटात स्ट्राँग नेते सहभागी होत नसल्याने स्थानिक पातळीवर जबाबदारी घेतलेल्या शिंदे समर्थक नेत्यांवरदेखील दबाव होता. शिंदे गटात प्रवेश करण्याचे अनेकांना निमंत्रण आहे. परंतु राजकीय भवितव्य काय या विषयावरून संभ्रम आहे. माजी नगरसेवकांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात हाच सवाल विचारला जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून थेट कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे निवडून येण्याचा विश्वास असलेले बारा नगरसेवक येत्या मंगळवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

जोरदार शक्तीप्रदर्शन

सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर प्रभागातील विकास कामासंदर्भात तसेच निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली जाईल. याच बैठकीत प्रमुख प्रश्‍नासंदर्भातदेखील चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश झाल्यानंतर सर्व माजी नगरसेवक तसेच अन्य पक्षातून शिंदे गटात प्रवेशकर्ते झालेल्या पदाधिकाऱ्यांचा एकत्रित ताफा नाशिकमध्ये एन्ट्री करेल. या माध्यमातून नाशिक शहरांमध्ये शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन होईल.

सत्तेत वाटेकरी झाल्यास

महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सत्ता आल्यास किंवा जे काही नगरसेवक निवडून येतील. त्यांच्यातून महापौर व उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती व गटनेते, विविध विषय समित्या, गटनेते पद आदींची बोलणी केली जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com