Sharad Pawar : कोश्यारींबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; पवार म्हणाले, "पंतप्रधान, राष्ट्रपतींनी.."

Sharad Pawar : अशी विधानं करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी देणं योग्य नाही,
sharad Pawar
sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. "राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. वादग्रस्त विधान करणं हा राज्यपालांचा लौकीक आहे," असा टोला पवारांनी कोश्यारींना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

"अशी विधानं करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी देणं योग्य नाही, राज्यपालांच्या या विधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपतींनी दखल घ्यावी," असे पवार म्हणाले.

sharad Pawar
Udayanraje Bhosale : कोश्यारी, त्रिवेंदींना लाज वाटत नाही का ? ; उदयनराजे भडकले

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावाबाबत केलेल्या विधानानंतर कर्नाटक सीमावादाला पुन्हा फोडणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून महाराष्ट्रातही राजकारण पेटले आहे.

बेळगाव निपाणी, कारवार सोडणार ?

यावर शरद पवार यांनी बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला. मुख्यमंत्री बोम्मई यांनी जतबाबत केलेल्या विधानाला पवारांनी प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावले आहेत. "सीमावादावर भाजपला आपली जबाबदारी टाळता येणार नाही," असे पवार म्हणाले. "बोम्मई जर बेळगाव निपाणी, कारवार सोडणार असतील तर यावर चर्चा शक्य आहे," असा टोला पवार यांनी बोम्मई यांनी लगावला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.