Ashish Deshmukh On Thackeray : आरोप केले राऊतांनी, अन् देशमुखांनी हल्ला चढवला ठाकरेंवर !

Uddhav Thackeray : खोटं बोलून फडणवीसांना मुख्यमंत्रिपदापासून रोखलं व स्वतः ती खुर्ची मिळविली.
Ashish Deshmukh, Sanjay Raut and Uddhav Thackeray
Ashish Deshmukh, Sanjay Raut and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District Political News : २०१९ मध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून आला. जनमताचा कौल जनतेनं भाजपला दिला असल्याने त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, पण उद्धव ठाकरे यांनी खोटं बोलून त्यांना मुख्यमंत्रिपदापासून रोखलं व स्वतः ती खुर्ची मिळविली. (By lying, Fadnavis was prevented from being the Chief Minister and got the seat himself)

आता संजय राऊत देवेंद्र फडणवीस हे खोटारडे असल्याचे म्हणत आहेत. त्याला उत्तर देताना भाजप नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुखांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे अतिशय खोटारडे आहेत. ते रेटून खोटं बोलतात. वारंवार खोटं बोलून ते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच चिखलफेक करतात. एवढा खोटारडा माणूस आपण बघितला नाही,’ असा आरोप शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला.

सकाळी-सकाळी राऊतांनी केलेल्या या विधानाचा डॉ. देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला. राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. खोटारडे उद्धव ठाकरे आहेत. २०१९मध्ये जेव्हा सत्ता आली, तेव्हा सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांचा हक्क होता.

खोटं बोलून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्रिपद मिळविले. त्यामुळे खोटारडे कोण, हे सर्वांनाच माहीत असल्याचे देशमुख म्हणाले. भाजपच्या ओबीसी जनजागरण यात्रेसाठी डॉ. आशिष देशमुख आज (ता. 5) चंद्रपुरात आले होते. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेणार असल्याचे आपण बघणार आहोत, असं विधान राज्याचे अन्न, औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. यानंतर राज्यभर एकच चर्चा सुरू झाली. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क केले जाऊ लागले. त्यापूर्वी पूर्ण पाच वर्षांसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करू’, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

याबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस हे अतिशय मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रिपद देऊन आपला दिलदारपणा सिद्ध केला, पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावे, तशी राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले. बिहारच्या धर्तीवर राज्यातही जातीनिहाय जनगणना व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी प्रवर्गाची स्थिती पुढे येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Ashish Deshmukh, Sanjay Raut and Uddhav Thackeray
OBC समाजासाठी आशिष देशमुख आक्रमक | Ashish Deshmukh | OBC Reservation

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com