Nagaland News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमध्ये सरकारला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सात आमदार नागालँडमध्ये निवडून आले आहेत. पवार यांनी पत्रकार परिषद घेत नागालँडमध्ये भाजपला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादीने भाजपप्रणित (BJP) सरकारला पाठिंबा दिल्यामुळे त्याची एकच चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, नागालँडमध्ये आमचा पाठिंबा तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, भाजप सरकारला नाही. नागालँडमध्ये भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. तर नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला २५ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले आहे. नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
सरकारला पाठिंबा देताना पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या प्रचारात तेथील मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांचा पराभव करा असे म्हटले होते. निकालानंतर मोदी त्याच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले. त्यांच्या मंत्रिमंडळातही भाजप सहभागी झाली आहे. ही भूमिका आम्ही घेतलेली नाही, असे पवार म्हणाले.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलतना पवार म्हणाले होते, नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. नागालॅंड येथे १२ जागा लढविल्या आणि तेथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) पक्षाच्या 7 उमेदवारांना विजयी करीत काम करण्याची संधी दिली. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र वर्मा त्यांना नागालॅंडला पाठविले आहे. पुढील दोन दिवसात ते तेथील सर्वांशी चर्चा करतील. तेथे काय आणि कसे करायचे, याची माहिती मला देतील आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे, असे पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
नरेंद्र वर्मा यांनी नागालॅंडमधील पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. त्यांचा कल सरकारसोबत जाण्याचा होता चर्चा आहे. आमदारांचा सत्तेकडे कल असल्यामुळेच पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेल्याचे बोलले जात आहे. आमदारांनी सत्तेचा आग्रह केल्यामुळे राष्ट्रवादी आता सत्तेत सहभागी होणार आहे. त्यामुळे नागालॅंडमध्ये सर्व पक्षीय सरकार सत्तेत असणार आहे.
नागालँडमधील पक्षीय बलाबल :
*नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी : 25
*भाजप : 12
* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : 7
*नागा पीपल पार्टी : 5
*अपक्ष : 4
*रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया - 2
*लोक जनशक्ती पार्टी - 2
*नागा पीपल फ्रंट - 2
*जनता दल युनायटेड - 1
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.