शेवटी विजय उद्धव ठाकरेंचाच होईल; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

Sharad Pawar Latest Marathi News : गुवाहाटीला गेलेले आमदार पुन्हा परत येतील.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : बंडखोरांवर कारवाईचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आहे. येत्या दोन तीन दिवसात कारवाई होईल, अशी अपेक्षा आज नाहीतर उद्या बंडखोरांचे राजीनामे घेतले जातील. आमदारांना परत आणण्यासाठी लवकरच पावले उचलणार, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा अर्ज भरण्यासाठी पवार दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, आमचा उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत ते पुन्हा परत येतील. राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. शिवसेनेचा (Shivsena) एक गट आसाममध्ये गेला आहे, त्यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरुन शिंदे गटाला सत्तापरिवर्तन हवं आहे, यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? भाऊ सुनिल राऊत गुवाहटीला जाण्याच्या तयारीत...

अद्यापही आमची आघाडी कायम ठेवू. बंडखोरी केलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर आपली भूमिका बदलतील. त्यांना परत आणण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील. शिवसेना याबाबत आजच पावले उचलेल, असेही पवार यांनी सांगितले. आज नाही तर उद्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. शिंदे यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी मुंबईत यावे. संख्याबळ असेल तर ते गुवाहाटीत का थांबले आहे, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढे केले त्याचा फायदा काय? राष्ट्रपती राजवट आली तर बंडाला अर्थ काय आहे. बंडखोरांनी निवडलेले राज्य गुजरात आणि आसाम, या दोन्ही राज्यात सत्ता कोणाची आहे, असा सवालही पवार यांनी केला. शिंदे गटासोबत जर इतर राष्ट्रीय पक्ष नसतील तर भाजपशिवाय कोण आहे. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. शेवटी उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com