मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिनसेनेत खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत सुमारे 40 आमदार गुवाहाटीला गेले असून यामध्ये शिवसेनेच्या आठ मंत्र्यांचाही समावेश आहे. यामध्ये शिवसेनेची (Shivsena) मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले मंत्री गुलाबराव पाटीलही (Gulabrao Patil) शिंदे गटात दाखल झाले आहे.
दरम्यान,आज दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटलांवर जळजळीत टीका केली. पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील, अशी टीका केली आहे.
राऊत म्हणाले, गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की, शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले. ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसाव लागेल. हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा. मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे 30 वर्ष काम केलं आहे. माझा शब्द कधी खोटा होत नाही. अश्या शब्दात राऊतांनी पाटलांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, संदिपान भुमरे यांना पहिल तिकीट मिळालं तेव्हा ते वॅाचमन होते. तेव्हा साधा शिनसैनिक म्हणून त्यांना तिकीट देण्यात आल होतं. तेव्हा त्यांना हॅाटेलमध्ये वडा-सांबर सुद्धा खाता येत नव्हतं. ते जमिवर बसून खायचे. मात्र, ते आज कॅबिनेट आहेत. ते कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि रडत होते. मात्र, त्यांचे कसे खोटे आश्रु होते हे आज कळत आहे. हे सगळे धुंदीत आहेत. हे सर्व व्हिडिओमधून दिसत आहेत. मात्र, ज्यांना जायच आहे त्यांना जाऊद्या मात्र, आजही बॅास म्हणून उद्धव ठाकरेच आहेत, असे राऊत यांनी ठणकावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.