Sharad Pawar News : नितीशकुमारांच्या 'यू-टर्न'वर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Nitish Kumar swearing ceremony : 'ज्यावेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस...'असा सूचक इशाराही पवारांनी दिला आहे.
Sharad Pawar and Nitish Kumar
Sharad Pawar and Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar and Nitish Kumar news : मागील काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर रविवारी अखेर या राजकीय महानाट्याचा समारोप झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडत, पुन्हा एकदा भाजपचा हात धरला आणि बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे विरोधकांच्या एकजुटीसाठी आणि इंडिया आघाडीच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम नितीश कुमार यांनीच पुढाकार घेतला होता. मात्र त्यांनी आता मोठा यू-टर्न घेतला आहे.

नितीश कुमारांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने विरोधकांनाही मोठा धक्का बसला आहे. शिवाय राजकीय वर्तुळातूनही उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.(Sharad Pawar on Nitish Kumar swearing ceremony)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Nitish Kumar
NitishKumar : मोठी बातमी! नितीशकुमारांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

शरद पवार म्हणाले, 'इतक्या कमी दिवसांत अशा पद्धतीने सरकार बदलणं, अशी स्थिती या पूर्वी कधी पाहायला मिळाली नाही. दोन-तीन महिन्यांपूर्वी नितीशकुमार यांनीच विरोधकांची एकजूट व्हावी यासाठी पाटणा येथे बैठक बोलावली होती. विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे या भूमिकेवर मागच्या पंधरा दिवसांपूर्वी ते काम करत होते.मग अचानक काय झाले मला माहीत नाही.'

तसेच 'आता त्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार बनवले आहे. याच्या आधी सरकार बनवल्यानंतर इतका वेळा कोणी बदल केला असे पाहायला मिळाले नाही. मात्र नितीश कुमार यांनी याचा विक्रम केला आहे. अशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वी कधीही झाली नाही, ती नितीश कुमार यांच्यामुळे पुढे आली आहे.' असंही पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar and Nitish Kumar
Nitish Kumar News : नितीशकुमारांचं आधीच प्लॅनिंग, इंडिया आघाडीत...! खर्गेंचा गंभीर आरोप

शिवाय 'अशा घटनांमध्ये याअगोदर हरियाणाचे नाव देशापुढे होतं. हरियाणामध्ये आयाराम-गयाराम ही फेज पाहायला मिळत होती. मात्र हरियाणाच्या आयाराम-गयाराम यांच्यापेक्षा देखील, आता जास्त वेळा नितीशकुमार यांनी बाहेर पडणं स्वीकारलं आहे. आता यावर बोलणं योग्य नाही. ज्यावेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस लोक मतदानाच्या माध्यमातून करारा जवाब देतील.' असा सूचक इशारही शरद पवार यांनी यावेळी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com