NitishKumar : मोठी बातमी! नितीशकुमारांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Bihar Politics : नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतली आहे.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bihar News : नितीशकुमार यांनी अखेर भाजपबरोबर जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीशकुमार यांच्याबरोबर भाजप नेते विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबरोबरच आजच 'जेडीयू'च्या पाच, तर भाजपच्या तीन आणि एका अपक्ष आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (NitishKumar Takes Oath in Bihar Chief Minister)

नितीशकुमार यांनी भाजपबरोबर जात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 'इंडिया' आघाडीत नितीशकुमारांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात अंतर्गत धुसफुस सुरू होती. त्यामुळे नितीशकुमार हे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitish Kumar
Nitish Kumar Resign : मोठी बातमी! नितीशकुमार यांचा राजीनामा, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार

नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत गेला आणि अखेर नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत 'आरजेडी'ला धक्का दिला. रविवारी (ता. 28 जानेवारी) सकाळी नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर लगेचच सायंकाळी भाजपच्या पाठिंब्यावर नितीशकुमारांनी भाजप आणि 'जेडीयू'चं सरकार स्थापन करीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

या भाजप आणि 'जेडीयू'च्या सरकारमध्ये आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. पाटणा येथील राजभवनामध्ये या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. नितीशकुमारांनी राजीनामा का दिला? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, दीड वर्षापासून बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार होते. आम्ही चांगले काम करीत होतो. पण काही लोक नाराज होते. त्यामुळे आमच्या काही लोकांचं आम्ही ऐकलं. महागठबंधनच्या सरकारमध्ये कोणी काम करीत नव्हते, त्यामुळे अडचण झाली होती, अशी प्रतिक्रिया नितीशकुमारांनी दिली होती.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Nitish Kumar
Nitishkumar : नितीशकुमारांना 'कमळा'शिवाय करमेना; तीन वेळेस संसार मोडूनही चौथ्यांदा प्रेमात !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.