Rahul Gandhi : राहुल गांधीच्या ‘पोर्टफोलिओ’तील स्टॉकची दमदार कमाई; घोटाळ्याचा आरोप आजही कायम?

Share Market BSE NDA Government : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राहुल गांधींनी शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
Rahul Gandhi, Share Market
Rahul Gandhi, Share MarketSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. निवडणुकीच्या निकालादिवशी बाजार कोसळला अन् काँग्रेस नेते राहुल गांधी दोन्ही नेत्यांवर भडकले. शेअर बाजारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

एकीकडे राहुल गांधी बाजारा घोटाळा झाल्याचा आरोप करत असताना त्यांचीही बाजारात मोठी गुंतवणूक आहे. यातील काही स्टॉक त्यांना चांगलीच कमाईही करून देत आहेत. राहुल गांधींच्या पोर्टपोलिओनुसार, त्यांच्याकडे ‘जीएमएम फॉडलर’चे 1121 शेअर आहेत. लोकसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जामध्ये ही माहिती आहे. या कंपनीचे शेअर एकाच दिवसांत 12 टक्क्यांनी वाढले आहेत.

‘आज तक’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारीपासून आतापर्यंत या कंपनीचा स्टॉक 11 टक्क्यांनी घसरला आहे. एक जानेवारीला या स्टॉकची किंमत 1592 रुपये होती. ती आता 1402.05 एवढी आहे. एका वर्षाआधी हा स्टॉक 1548 रुपयांवर गेला होता. मागील पाच वर्षात तब्बल 185.45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राहुल गांधींची किती गुंतवणूक?

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांची शेअर बाजारात 4.3 कोटी रुपयांच गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडामध्ये 3.81 कोटी ठेवी आणि दोन बँक खात्यांमध्ये 26.25 लाख रुपयांची बचत आहे. राहुल यांनी पिडिलाइट इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट, टायटन कंपनी, हिंदूस्तान युनिलिव्हर, गरवारे टेक्निकल फायबर्स अशा काही बड्या कंपन्यांचे शेअरमध्येही मोठी गुंतवणूक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले होते.

मागील काही महिन्यांत शेअर बाजाराने अनेक उच्चांक गाठले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर काही काळ कोलमडलेले मार्केट पुन्हा तेजीत आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी घोटाळ्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. पण त्याचा परिणाम बाजारावर झाला नाही. बाजार तेजीत असताना राहुल यांचे स्टॉकही कमाई करून देत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com