Rahul Gandhi : प्रणव मुखर्जींचा मंत्री होण्याचा सल्ला, पण राहुल गांधींनी...! मुलगी शर्मिष्ठांच्या पुस्तकात अनेक खुलासे

Pranab Mukherjee News : वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारे पुस्तक लवकरच होणार प्रकाशित
Pranab Mukharjee, Rahul Gandhi
Pranab Mukharjee, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Latest Political News : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात अनेक मोठे राजकीय खुलासे केले आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी त्यांनी अनेक खुलासे केले आहे. राहुल यांची राजकीय परिपक्वता, मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा सल्ला, पंतप्रधानपद याबाबत केलेल्या खुलाशांमुळे चर्चांना उधाण आले आहे.’

शर्मिष्ठा यांचे ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना बडे खुलासे केले आहेत. त्यांनी २०२१ मध्येच राजकीय संन्यास घेतला आहे. ‘राहुल गांधी (Rahul Gandhi) खूप विनम्र आणि मनात खूप प्रश्न आहेत. पण ते राजकीयदृष्ट्या परिपक्व नाहीत,’ असे प्रणव मुखर्जी म्हणाल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

Pranab Mukharjee, Rahul Gandhi
BJP : भाजप जिंकत असलेली राज्ये म्हणजे 'गोमूत्र'..! खासदाराच्या वक्तव्याने मोठा गदारोळ

प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात येत असत. पण या भेटी क्वचितच व्हायच्या. त्यावेळी त्यांनी राहुल यांना मंत्रिमंडळात सहभागी होऊन प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता. पण राहुल यांनी त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शर्मिष्ठा यांनी आपल्या पुस्तकात २००४ मधील सरकार स्थापनेवेळची आठवण लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, २००४ मध्ये वडिलांना पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर विचारले असता त्यांनी अचंबित करणारे उत्तर दिले होते. ‘नाही, त्या मला पंतप्रधान ना बनवणार,’ असे उत्तर प्रणव मुखर्जी यांनी दिले होते. पण त्यांच्या मनात पंतप्रधान न केल्याबद्दल सोनिया गांधी यांच्याविषयी कसलीही नाराजी नव्हती. तसेच पंतप्रधान केलेल्या मनमोहन सिंग यांच्याविषयी शत्रुत्वाची भावना नव्हती, असे पुस्तकात म्हटले आहे.

Pranab Mukharjee, Rahul Gandhi
Amit Shah : देशाला दोन पंतप्रधान, दोन राज्यघटना, दोन झेंडे कसे असतील? अमित शाह लोकसभेत संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com