
Shashi Tharoor Politics : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेत धक्का दिला आहे. यावेळी त्यांनी स्वतःचेच म्हणणे खोडून काढत मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मी मूर्ख ठरलो, असे विधान त्यांनी केल्याने काँग्रेस नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.
मागील काही महिन्यांपासून थरूर यांच्याकडून करण्यात आलेली अनेक विधाने तसेच त्यांची कृती पक्षविरोधी ठरत आहे. अशाच आणखी एका विधानाची त्यात भर पडली आहे. थरूर यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाबाबत मोदी सरकारची भूमिका चुकीची असल्याच्या आपल्याच वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
रायसीना डायलॉग 2025 या कार्यक्रमात मंगळवारी त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘आपण रशिया-युक्रेन युद्धाबाबत 2022 मध्ये घेतलेली भूमिका योग्य नव्हती. त्याचा आता पश्चाताप होत आहे. असे दिसते की त्यावेळी मी मूर्ख ठरलो.’ रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर थरूर यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली होती.
रशिया-युक्रेन युद्धावर थरूर यांनी 2022 मध्ये संसदेत आपले मत मांडले होते. ते म्हणाले होते की, युध्दाबाबत भारताचे मौन युक्रेन आणि त्याच्या पाठीराख्यांसाठी निराशाजनक असेल. रशिया आपला मित्र आहे. त्यामुळे काही कायदेशीर, सुरक्षाविषयक समस्या असू शकतात. परंतु युध्दाच्या मुद्द्यावर भारताचे निराश करणारे आहे.
थरूर यांनी या विधानावरून आता यू टर्न घेतला आहे. तीन वर्षांनंतर मला असे वाटते की, मी मूर्ख ठरलो आहे. त्यावेळच्या भारताच्या धोरणाचा अर्थ असा आहे की, आज भारताकडे असे पंतप्रधान आहेत, जे दोन आठवड्यांच्या कालावधीत युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेटतात. भारताची आज जी स्थिती आहे ती भूतकाळात ठरवलेल्या धोरणांमुळे आहे, हे सांगण्यासही थरूर विसरले नाहीत.
दरम्यान, थरूर यांची मागील काही दिवसांतील विधाने पक्षाचे टेन्शन वाढवणारी ठरली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतचा एक फोटोही ट्विट केला होता. त्यानंतर तर त्यांच्या नाराजीची चर्चा अधिकच वाढली होती. आता त्यांनी पुन्हा मोदींच्या धोरणाचे कौतुक केले आहे. यापूर्वीही त्यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे कौतुक केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.