Shaikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा! भारत प्रत्यार्पण करणार का? स्पष्ट केली भूमिका; लोकांच्या हितासाठी...

Shaikh Hasina: बांगलादेशातील अलिकडच्या निकालाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.
Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

Shaikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि हिंसक सत्तापालटानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसीना यांना बांगलादेशातील स्थानिक कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची भारतानं गंभीर दखल घेतली असून आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं असून याद्वारे भारत हसीना यांच्याबाबत काय निर्णय घेणार याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Sheikh Hasina
Shaikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा! नेमकं प्रकरण काय?: भारतातून मायदेशी परतावं लागणार

भारत-बांगलादेश प्रत्यार्पण करार

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये २०१३ मध्ये हसीना यांच्या सरकारच्या कार्यकाळातच एक प्रत्यार्पणासंबंधीचा करार पार पडला आहे. यामध्ये तरतूद आहे की, राजकीयदृष्ट्या प्रेरित आरोपांमध्ये जर प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली तर ती फेटाळण्यात येऊ शकते. पण यामध्ये जर हत्या, अपहरण, बॉम्ब स्फोट आणि दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित मानलं जाणार नाही. त्यामुळं नेमक्या हसीना या हत्या आणि नरसंहाराच्या गंभीर गुन्हांमध्ये दोषी ठरल्यानं त्यांचं प्रत्यार्पण न करण्याची भूमिका घेणं भारतासाठी अवघड असणार आहे.

Sheikh Hasina
Maharashtra Election: भाजपला थंडीत 'ताप'! मेगाभरतीमुळे बालेकिल्ल्यातच निष्ठावंतांकडून बंडाचा झेंडा

विनंती मान्य न करण्याची तरतूद

२०१६ मध्ये झालेल्या एका करारानुसार भारत बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण करारात एक तरतूद आणखी जोडण्यात आली होती. त्यानुसार, गुन्ह्याचा पुरावा देणं गरजेचं नाही. प्रत्यार्पणासाठी कोर्टाचं अटकेसंदर्भातील एक वॉरंटही पुरेस असणार आहे. पण याशिवाय या प्रत्यार्पण करारात अशाही काही तरतुदी आहेत ज्याद्वारे भारत बांगलादेशच्या प्रत्यार्पणाच्या मागण्या अमान्य करु शकतो.

भारताची अधिकृत भूमिका काय?

दरम्यान, भारतानं याप्रकरणी आपली अधिकृत भूमिका नुकतीच स्पष्ट केली आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं की, "बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत 'आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण'ने जाहीर केलेल्या निकालाची भारताने दखल घेतली आहे. जवळचा शेजारी म्हणून, भारत बांगलादेशच्या लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी वचनबद्ध आहे. यामध्ये त्या देशातील शांतता, लोकशाही, समावेशकता आणि स्थिरता यांचा समावेश आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच सर्व घटकांशी रचनात्मकपणे संवाद साधू" असं निवेदनात म्हटलं आहे. पण शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात देण्याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com