Shirdi Crime News : तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; जावयाने सासुरवाडीत धारधार शस्त्राने केला हल्ला !

Ahmednagar Crime News : पत्नी, मेहुणा आणि आजी जागीच ठार, तीन जणांवर उपचार सुरू...
Mira Road Crime News :
Mira Road Crime News :Sarkarnama

Shirdi News : नगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ सावळे विहीर या ठिकाणी जुन्या कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीमध्ये असलेल्या पत्नीसह इतर पाच जणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजी, सासू यांचा जागीच मृत्यू झाला असून सासू, सासरे आणि मेहुणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आरोपी सुरेश विलास निकम आणि रोशन कैलास निकम यांना नाशिक रोड पोलिसांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने घटना घडल्यानंतर पाच तासांत अटक केली आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Mira Road Crime News :
Nagpur OBC Morcha : फडणवीसांच्या शब्दावर नाही भाजप नेत्यांनाच विश्वास, धडक मोर्चात झाले सहभागी !

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, "शिर्डीजवळ सावळे विहीर इथे गायकवाड कुटुंब राहते. गायकवाड यांचे जावई सुरेश विलास निकम आणि त्यांचे नातेवाईक रोशन कैलास निकम (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर) हे दोघेजण रात्री दहा वाजेच्या सुमारास सावळे विहीर येथील सासुरवाडी येथे आले. घराचा दरवाजा उघडताच या दोघांनी घरातील सहा नातेवाइकांवर चाकूने बेछूट हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये सुरेश निकमची पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजी सासू हिराबाई गायकवाड यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सासरे चांगदेव गायकवाड, सासू संगीता गायकवाड आणि मेहुणी योगिता जाधव हे तिघेजण गंभीर जखमी झाले.

हल्ला केल्यानंतर दोन्हीही आरोपी नाशिकच्या दिशेने पसार झाले होते. दरम्यान, नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचे लोकेशन मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक रामदास विंचू यांना याबाबतची माहिती दिली. नाशिक रोड पोलिसांनी तातडीने पावले उचलत नाशिक-पुणे रोड वरील शिंदे गाव टोल नाक्याजवळ सापळा रचून मोटारसायकलवरून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम या दोघांना ताब्यात घेतले.

Mira Road Crime News :
NCP On Padalkar : पडळकरांनी अजित पवारांची नव्हे तर भाजपची नाचक्की केली!

या दोघांनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह नाशिक रोड येथे पोहाेचत, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांवर हल्ला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com