शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या; दहशतवादी संघटनांनी दिली होती धमकी

Shivsena| Amritsar| काही दिवसांपूर्वी अमृतसरमध्ये हिंदुत्व आणि अन्य धर्माच्या अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
 Amritsar Crime news
Amritsar Crime news

Shivsena| अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सोनी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घटनेच्या वेळी सुधीर सोनी अमृतसर येथील गोपाल मंदिरात आंदोलन करत होते. गेल्या काही दिवसांत अमृतसरमधील गोपाल मंदिराजवळील कचऱ्यातून देवाची मूर्ती सापडली होती, याच्या निषेधार्थ शिवसेना नेते सुधीर सोनी आणि इतर हिंदू संघटनांच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केले होते.

गोपाल मंदिराबाहेर हिंदू संघटनांच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा मोठा जनसमुदाय निषेध स्थळी जमला होता. याचाच फायदा घेत मंदिराबाहेर इतर हिंदू संघटनांच्या नेत्यांसोबत धरणे धरायला बसलेले शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गर्दीतून कोणीतरी गोळीबार सुरू केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 Amritsar Crime news
NMC : कॉंग्रेस कार्यकर्ते ‘भारत जोडो’त, तर राष्ट्रवादी ‘चिंतनात’ व्यस्त; शिवसेनेचे काय?

काही दिवसांपूर्वी अमृतसरमध्ये हिंदुत्व आणि अन्य धर्माच्या अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. कॅनडा आणि इतर देशांमध्ये बसलेल्या दहशतवादी संघटनांकडून या नेत्यांना अशा धमक्या दिल्या जात असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र, अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या कोणत्या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आल्या, याचा खुलासा अहवालात करण्यात आलेला नाही. यादरम्यान सुधीर सुरी यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

या घटनेनंतर कॅनडा आणि इतर देशांमध्ये असलेल्या दहशतवादी संघटना, पंजाब आणि अमृतसरमधील अल्पसंख्याक समाजातील हिंदू आणि अन्य धर्माच्या नेत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दहशतवादी संघटनांशी संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर कॅनडा आणि इतर देशांमध्ये असलेल्या दहशतवादी संघटना, पंजाब आणि अमृतसरमधील अल्पसंख्याक समाजातील हिंदू आणि अन्य धर्माच्या नेत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दहशतवादी संघटनांशी संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com