मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लढाई आता आरपारची बनली आहे. त्यातच शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिंदे गट अधिकच आक्रमक झाला असून त्यांनी थेट इशारा दिला आहे. शिंदे यांनी ट्विट करत राऊतांसह ठाकरेंनाही थेट आव्हान दिलं आहे. (Eknath Shinde Latest News)
शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांना (Sanjay Raut) टॅग केलं आहे. ‘मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर,’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मनी लाँर्डिंग प्रकरणात तुरूंगात आहे. त्यांच्या व्यवहारांचा दाऊदशी संबंध असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये याचाच संदर्भ देत शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.
‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू,’ असं ट्विट करत शिंदे यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले होते की, गुवाहाटीला गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत. ते मनाने मेले आहेत. ही जिवंत प्रेतं आता मुंबईत येतील. त्यांच्यात आत्मा नसेल.तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू, असं वक्तव्य राऊतांनीकेलं. यावरून वाद निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.