मुंबई : मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण पूर्ण झाली आहेत. आठ वर्षांच्या कालावधीला उत्सवाचे स्वरुप दिले जात असल्याचे टीका शिवसेनेनं (shiv sena) केली आहे. शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. अग्रलेखातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (modi government) यांच्यावर टीका करण्यात आली.
भाजपला विरोध करणाऱ्या काश्मिरींना देशद्रोही ठरवू नये, असे टोला लगावला आहे. पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करत त्याबाबत शंका अग्रलेखात उपस्थित करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची 56 इंच छाती आणि हृदय हिंदूंप्रती दाखवले आहे, असे यात म्हटलं आहे.
काश्मिरी पंडितांचं पुन्हा हत्याकांड सुरु झाले असताना मोदी शाह केंद्रात सरकारची 8 वर्षे साजरी करण्यात मश्गूल आहेत अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. एकीकडे देशातील जनता समस्यांमुळे होरपळत आहे, तर दुसरीकडे देशाचा राजा आपल्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जल्लोषात मग्न असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
"जे हिंदुत्वाबद्दल गळा काढतात ते, गरज पडेल तेव्हा गप्प बसतात. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या मदतीने भाजपने गेल्यावेळी सरकार स्थापन केले होते, पण काश्मीरमधील परिस्थिती पाहून आता लोकांना त्यांच्या वास्तवाची कल्पना आली आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्ष हे अजब रसायन आहे. हे लोक राष्ट्रीय किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर गळा काढून बोलत असले, तरी जेव्हा हिंदुत्व खरोखरच अडचणीत येते, तेव्हा तोंडाला कुलुप लावून गप्प बसलेले दिसतात.
काश्मीर खोर्यातील हिंदू पंडितांच्या हत्या आणि काश्मीर सोडण्याबाबत भाजप आणि त्यांचे दिल्लीचे अधिकारी गप्प बसले आहेत. देशभरातील भाजपवाले मोदी सरकारचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत.
ज्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक केले जात आहे, त्या सर्जिकल स्ट्राईकचा कॅश करुन मागच्या निवडणुका जिंकल्या, पण आज काश्मीरची स्थिती बिकट झाली असून हिंदूंच्या रक्ताची नदी तेथे वाहत आहे.
काश्मिरी पंडित मारले जात आहेत. हिंदूंनी सामुदायिक पलायन सुरु केले आहे. पंडितांचा एक गट काश्मीरच्या रस्त्यावर उतरुन भाजपला शिव्या देत आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.