Sonam Wangchuk Safdarjung Hospital : सोनम वांगचुक यांना ठाकरेंच्या शिलेदारांना भेटू दिले नाही; खासदार सावंत संतापले, न्यायालयाचा उपचाराबाबत मोठा निर्णय

Shiv Sena UBT MPs claim they were denied permission to meet Sonam Wangchuk at Safdarjung Hospital : अरविंद सावंत, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांना सुमारे पाऊण तास प्रतीक्षा करूनही भेट मिळाली नसल्याची माहिती; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वांगचुक यांना पसंतीच्या रुग्णालयात उपचाराचा मार्ग मोकळा.
Sonam Wangchuk Safdarjung Hospital
Sonam Wangchuk Safdarjung HospitalSarkarnama
Published on
Updated on

Safdarjung Hospital Delhi : गांधीवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना सफदरजंग रुग्णालयात भेट मिळाली नसल्याचा दावा समोर आला आहे.

पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि सुभाष देसाई हे तिघेही वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासनाकडून भेटीस परवानगी न मिळाल्याने त्यांना परतावे लागल्याचे सांगितले जात आहे.

नीट पेपरफुटी (NEET Exam) प्रकरणात केंद्रीय (Central Government) शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सुमारे 20 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली यांनी पतीला पसंतीच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी हलविण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात (Court) धाव घेतली होती. सुरुवातीला त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देत वांगचुक यांना पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा दिली.

Sonam Wangchuk Safdarjung Hospital
Sonam Wangchuk Court : 20 दिवसांच्या उपोषणानंतरही सोनम वांगचुक यांना दिलासा नाही; सफदरजंग रुग्णालयातून हलवण्यास न्यायालयाचा नकार

दरम्यान, वांगचुक यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरक्षा यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासनाकडून प्रतीक्षा करावी लागल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही भेटीबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तिघांनाही वांगचुक यांची भेट न घेता परतावे लागले. यानंतर हे खासदार आंदोलनस्थळी गेले आणि तेथे आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके तसेच उपस्थित विद्यार्थ्यांची भेट घेतली.

Sonam Wangchuk Safdarjung Hospital
Shirdi Fruit Vendor Murder : शिर्डीच्या साई मंदिरासमोर महिलेची निर्घृण हत्या; 'लोक बघत राहिले, कुणी पुढे का आले नाही?' विखे पाटलांचा संताप

दरम्यान, सफदरजंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वांगचुक यांच्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचेही आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वांगचुक यांना पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयाचे त्यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंगमो यांनी स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com