BJP and Vidhan Sabha Election: 'भाजपच ठरणार मोठा पक्ष' ; 'या' सर्व्हेने वाढवली महाविकास आघाडीची धाकधूक

Maharashtra Political News : राज्यात पुन्हा भाजपच ठरणार मोठा पक्ष, टाईम्स-मॅट्रिजच्या सर्व्हेने महाविकास आघाडीची धाकधूक वाढवली
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला आहे. लोकसभेत 48 पैकी 31 जागा मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कमीत कमी 160 जागा मिळतील, असे महाविकस आघाडीचे नेते सांगत आहेत. मात्र विधानसभेच्या अडीच तीन महिने आधीच आलेल्या TIMES-MATRIZE च्या सर्व्हेने आघाडीची धाकधूक वाढणार आहे. या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा सुमारे 105 भाजपच मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज आहे.

राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोणाची सरशी होणार, याबाबत या सर्व्हेतून अंदाज वर्तवला आहे. महायुतीतील भाजपला 95 ते 105 जागा मिळतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा 19 ते 24 जागांवर विजय होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 7 ते 12 जागांवर समाधान मानावे लागेल.

BJP
Narayan Rane : ..'या' प्रकरणी नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस!

या सर्व्हेच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला झटका बसेल, असेही स्पष्ट केले आहे. आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळतील. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या 26 ते 31 जागा येतील. तर शरद पवार गटाला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच इतर पक्ष आणि अपक्षांना 11 ते 16 जागा मिळणार असल्याचेही या सर्व्हेने सांगितले आहे.

आता निवडणुका झाल्या तर महायुतीला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल, असे सांगण्यात आले आहे. सर्व्हेनुसार भाजपला सर्वात जास्त 25.8 टक्के मते मिळतील. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात कमी म्हणजे 5.2 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. शिवसेना (शिंदे गट) 14.2 टक्के, काँग्रेस 18.6, उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) शिवसेनेला 17.6 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 6.2 टक्के मत मिळतील. तसेच इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार एकूण 12.4 मते घेतील, असेही या सर्व्हेतून सांगितले आहे.

BJP
Prakash Awade Vs Suresh Halvankar : आवाडे-हाळवणकर यांच्यात 'BJP'कडून मध्य मार्ग निघणार की गुंता वाढणार?

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनाच पसंती -

या सर्व्हेत मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे, असाही प्रश्न होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच सर्वात जास्त 27 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 23 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून कौल दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना 21 टक्के मतदारांनी पसंती दिली असून ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर असल्याचे सर्व्हेतून दिसून येत आहे. एकूणच या सर्व्हेने आता निवडणुका झाल्या तर महायुतीला मतदारांचा कौल असल्याचे सांगण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com