मुख्यमंत्री शिंदेंची १२ खासदारांनी घेतली उघड भेट; पहिला फोटो आला समोर

Chief Minister Eknath Shinde | Shivsena | MP : सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचीही माहिती
Eknath Shinde | Shivsena | MP
Eknath Shinde | Shivsena | MPSarkarnama

नवी दिल्ली : आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना (Shivsena) असून लोकसभेत आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी करणारे पत्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या १२ खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना लिहिले आहे. मात्र या पत्रात लोकसभा सचिवालयाकडून काही बदल सुचविण्यात आले असून, संबंधित पत्र हे मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या नावाने द्यावे अशी सुचना खासदारांना करण्यात आली आहे.

या पत्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यात १) आम्हीच अधिकृत शिवसेना असून आमच्याकडे संसदीय बहुमत आहे. २) त्यामुळे लोकसभेत वेगळा गट म्हणून आम्हाला मान्यता मिळावी. ३) भावना गवळी याच शिवसेनेच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) असतील. पत्र दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदारांनी, बहुमताचा कल पाहून लोकसभा अध्यक्ष याच गटाला मान्यता देतील व त्यांची आसन व्यवस्था (डिव्हीजन क्रमांक) या आठवड्यातच बदलेलं असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर आज दुपारी या १२ खासदारांनी त्यांची भेट घेवून शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या खासदारांमध्ये राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे. आज हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. (Eknath Shinde Group MPs Latest)

शिवसेनेचे लोकसभेत सध्या १९ खासदार आहेत. त्यापैकी १२ खासदार शिंदे गटासोबत गेले असून अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव हे खासदार ठाकरे गटासोबत आहेत. तर दीव-दमणच्या खासदार कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या खासदार असल्या तरीही त्या शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आल्या नसल्याने त्यांना शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही. त्यामुळे त्या नेमक्या कोणत्या बाजूने आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com