स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा पुण्यात मृत्यू

MPSC : पूजा ही बहिणीसोबत पुण्यात राहत होती.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama

पुणे : पुण्यात नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सोलापूरच्या तरुणीचा पुण्यातील अभ्यासिकेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव पूजा वसंत राठोड (वय २५, कोंडी तांडा, उत्तर सोलापूर), असे आहे. पूजा ही बहिणीसोबत पुण्यात राहत होती. (Pune Crime News)

Pune Crime News
पुण्यात MPSC चा अभ्यास करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या...

पूजा ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असतांना खासगी कंपनीमध्ये काम होती. मंगळवारी (ता. २७ सप्टेबर) सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी जवळ अभ्यास बसलेल्या विद्यार्थ्यांनी तिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ- बहिण, असा परिवार आहे.

Pune Crime News
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

दरम्यान, पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी राज्यीतील विविध भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी हे पुण्यात येत असतात. काही दिवसा पुर्वीच एका विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com