IPS officer viral video : धक्कादायक! DGP कार्यालयातच IPS अधिकाऱ्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हारल होताच सरकारची मोठी कारवाई

Government action after IPS officer video viral : DGP कार्यालयात IPS अधिकाऱ्याचा अश्लील प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओ व्हायरल होताच सरकारने मोठी कारवाई केली.
Ramchandra rao
Ramchandra raoSarkarnama
Published on
Updated on

Obscene video case : प्रशासनातून सध्या एक मोठा वादग्रस्त प्रकार समोर आला असून त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रामचंद्र राव यांच्या कार्यालयातील कथित आपत्तिजनक वर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये रामचंद्र राव हे पोलीस गणवेशात त्यांच्या कार्यालयात वेगवेगळ्या महिलांसोबत अतिशय अयोग्य वर्तन करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

या दृश्यांमध्ये ते महिलांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, हे सर्व प्रसंग त्यांच्या अधिकृत कार्यालयातच घडल्याचा आरोप आहे. वेगवेगळ्या वेळेस आणि वेगवेगळ्या कपड्यांमध्ये महिला दिसत असल्याने हे व्हिडिओ अनेक प्रसंगी गुप्तपणे चित्रीत करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणात जबरदस्ती किंवा अत्याचाराचे थेट आरोप अद्याप करण्यात आलेले नाहीत.

Ramchandra rao
Ajit Pawar : "राजकारण लय वंगाळ,म्हणत..." अजित पवारांचा कार्यकर्त्यांना 'दादा' स्टाईल हटके सल्ला! नक्की काय घडलं?

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्यापर्यंत पोहोचला. व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री संतप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यांनी संबंधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवली आणि पोलीस प्रशासनात अशा प्रकारची घटना कशी घडू शकते, याबाबत कठोर प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर चौकशी सुरू होण्याआधीच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रामचंद्र राव यांनी या सर्व आरोपांचा स्पष्ट शब्दांत नकार केला आहे. त्यांनी हे व्हिडिओ बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Ramchandra rao
Central Govt Employees : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राने लागू केली नवी सिस्टिम; पाहा, तुम्हाला कसा होणार फायदा?

आपण आठ वर्षांपूर्वी बेलगावी येथे कार्यरत होतो आणि हा प्रकार त्यानंतरचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या प्रकरणी आपल्या वकिलांशी चर्चा केली असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. कोणतीही चौकशी न करता निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com