Shraddha Walkar Case : देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. श्रद्धा वालकरचा प्रियकर असणारा आफताब पुनावाला याने आधी गळा दाबून तिचा खून केला. यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. या घटनेच्या खुलाश्यानंतर एकच खळबळ माजली. आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.
या हत्याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या आरोपपत्राचा मसुदा दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) तयार करून ठेवले असल्याची माहिती मिळत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात यासंबंधी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
या आरोपपत्र तब्बल तीन हजार पानांची आहे. आरोपपत्रात १०० लोकांचे स्टेटमेंट नमूद करण्यात आले आहे. तसेच, यामध्ये पुरावे म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक विभागाकडून प्राप्त झालेले अहवाल देण्यात आले आहेत. ३ हजार पानांचे बनलेले मसुदा आरोपपत्र आता अंतिम आरोपपत्राचा मुख्य भाग बनण्याची शक्यता आहे.
आरोपपत्रामध्ये पोलिसांनी आफताबचा कबूलनामा दिला आहे. आफताबचा नार्को टेस्टच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल जोडण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस पोलीस (Police) ही यासंबंधिची चार्जशीट न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.