भगवान श्रीरामच आमचे पैंगबर : मुस्लिम एकता मंचाच्या संयोजकाचा मोठा दावा

Uttar Pradesh Politics | रुबी खान यांनी गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची स्थापना केल्याने मुस्लिम कट्टरपंथीयांकडून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली.
Uttar Pradesh Politics |
Uttar Pradesh Politics |

BJP Politics : गणपती बाप्पाची मुर्ती बसवण्यावरुन भाजप (BJP) महिला मोर्चाच्या जयगंज मंडळाच्या उपाध्यक्षा रुबी आसिफ खान काही दिवसांपुर्वी चर्चेत आल्या होत्या. रुबी खान यांनी गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची स्थापना केली होती आणि नवरात्रीमध्ये उपवास ठेवला होता. यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांकडून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली. यानंतर प्रशासनाने रुबीला सुरक्षा पुरवली आहे.

दरम्यान, रुबी खान यांनी 'भगवान श्री राम आमचे पैगंबर' असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. या विधानामुळे त्यां पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबोधनपर परिषदेने हिंदू-मुस्लिम ऐक्याला बळ मिळाले आहे. एक उदाहरण मांडले आहे. आता मुस्लिम समाजातील लोकांना प्रभू राम आमचे पैगंबर असल्याची जाणीव होत आहे. सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Uttar Pradesh Politics |
शिवसेनेचे 25 खासदार, 115 आमदार आणि स्वबळावर मुख्यमंत्री ; राऊतांचा स्वबळाचा नारा

योगी आदित्यनाथ यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण घालून दिले आहे. आज मुस्लिम समाजातील लोक त्यांना समजून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भेदभाव दूर केले आहेत. मुस्लिम समाज जागा झाला आहे हे विरोधी पक्षांना कळू द्या. त्यांचे रक्षण भाजपच करू शकते हे या समाजाला कळून चुकले आहे. भाजपचे सरकार आल्यापासून उत्तर प्रदेश दंगलमुक्त झाला असल्याचंही रुबी खान यांनी म्हटलं आहे.

रुबी खान म्हणाल्या की, अलीगढमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत काही मुस्लिम लोक श्री रामचा नारा लावताना पाहून मला खूप आनंद झाला.देशांतर्गत बंधुभाव वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. याचा मला खूप आनंद आहे. आपण एका सनातन धर्माचे आहोत हे सर्वांना दिसत आहे. सर्व लोक आधी हिंदू होते आणि नंतर मुस्लिम बनवले गेले. जेव्हा ते जगात येतात तेव्हा ते हिंदू म्हणून जन्माला येतात आणि नंतर त्यांना मुस्लिम बनवले जाते. जे आमचे श्रीराम होते तेच पैगंबर होते. लोकांनीही आता हे स्वीकारले आहे आणि भविष्यातही सर्व लोक अशाच प्रकारे बंधुभाव निर्माण करत राहतील अशी आशा आहे. हिंदू मुस्लिम भेदभाव संपवा आणि आपण सर्व एक आहोत, कोणीही वेगळे नाही हे मान्य करा, असंही रुबी खान यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com