शिवसेनेचे 25 खासदार, 115 आमदार आणि स्वबळावर मुख्यमंत्री ; राऊतांचा स्वबळाचा नारा

Sanjay Raut | शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवस काय, जन्मठेप भोगायला मी तयार आहे.
Sanjay Raut |
Sanjay Raut |
Published on
Updated on

Sanjay Raut : आजच्या दिवशी आपली भारतीय राज्यघटना निर्माण झाली. पण हे राज्य कायद्यानं नाहीतर बेकायद्यानं चाललं आहे. या सरकारला संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार नाही. कारण हे सरकार आपल्या डोक्यावर बेकायदेशीर सरकार बसवलं आहे. हे सरकार लवकरच जाणार, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. बुलडाण्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

मी जवळपास ११० दिवस तुरुंगांत होतो, जाताना माझ्या हातात भगवा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहणार. लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुका असतील शिवसेनेचे 25 खासदार आणि किमान 115 आमदार आपण निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करुन या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे, तरच आपण शिवसैनिक, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला.

Sanjay Raut |
ठाकरेंचे बाण राणेंच्या जिव्हारी : अंधारेंचा एकेरी उल्लेख तर आदित्य ठाकरेंना इशारा

यापुढे एकही खोकेवाला निवडून येता कामा नयेत, ही शपथ आपण घेतली पाहिजे. शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवस काय, जन्मठेप भोगायला मी तयार आहे. ज्या शिवसेनेने मला नाहीतर महाराष्ट्र आणि देशाला दिलं, त्या शिवसेनेसाठी लाखो शिवसैनिक जीवाची कुर्बानी द्यायला तयार आहेत. त्यात एक संजय राऊत कुर्बान झाला तर काय झालं. आता आपणही दाखवून देऊ, आमच्यावर कितीही अन्याय, अत्याचार करा पण लाखो शिवसैनिक तुम्हाला विकत घेता येणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटलं.

जरी चाळीस रेडे गुवाहाटीला नवस करायला गेले असले तरी त्यांच लक्ष या सभेकडे आहे. त्यांना माहिती आहे समोर असलेली ही लाखोंची गर्दी नवस करुन आणलेली नाहीये. शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी १०० दिवस काय जन्मठेप भोगायला देखील तयार आहे, महाराष्ट्राचा इतिहास हा लढवय्या आहे, त्यामुळे हे ४० रेडे महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा त्यांना जाब विचारा. शिवसेनेचे चिन्ह काय आहे मशाल. आमची मशाल गद्दारांचे खोके साफ केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी घणाघाती टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com