Karnataka Next CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री? : शुभेच्छा देत शिवकुमार म्हणाले ‘मी बंडखोर नाही अन्‌ ब्लॅकमेलही करत नाही’

Siddaramaiah - D. K. Shivakumar: प्रकृतीचे कारण देत शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला.
Siddaramaiah - D. K. Shivakumar
Siddaramaiah - D. K. ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दिल्लीत गेलेल्या सिद्धरामय्या यांनी पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यात यश मिळविले असून त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, हे पक्के झाले आहे. दरम्यान, प्रकृतीचे कारण देत शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्याचीही चर्चा कर्नाटकात जोरात रंगली आहे. (Siddaramaiah is the next Chief Minister of Karnataka)

दरम्यान, कर्नाटक (Karnataka) काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनही सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना ‘ऑल द बेस्ट’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) शिवकुमार यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत

Siddaramaiah - D. K. Shivakumar
Dk Shivkumar : माझ्यासह १३५ आमदार सोनिया गांधींना समर्पित : डी. के. शिवकुमारांची भावना; मुख्यमंत्रिपदाचा विषय हायकमांडवर सोपवला

डी. के. शिवकुमार हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार होते. त्यांनी रात्री साडेसात वाजता दिल्लीला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचे तिकीटही काढले होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या.

Siddaramaiah - D. K. Shivakumar
NOTA Votes : कर्नाटकात अपक्षाला ‘नोटा’ ठरला भारी : प्रत्येक मतदारसंघात सरासरी १२०० मते

शिवकुमार म्हणाले की, आजारपणामुळे मी दिल्लीचा दौरा रद्द केला. चेंडू आता केंद्रीय नेत्यांच्या कोर्टात आहे. कर्नाटकातील ऐतिहासिक विजयामागे कोण आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे संख्याबळ आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. मी बंडखोर नाही आणि ब्लॅकमेल करत नाही. मला दृष्टी आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी षड्‍यंत्राला कधीही बळी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com