Dk Shivkumar : माझ्यासह १३५ आमदार सोनिया गांधींना समर्पित : डी. के. शिवकुमारांची भावना; मुख्यमंत्रिपदाचा विषय हायकमांडवर सोपवला

मी कोणाच्या नंबरबद्दल बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांची निवड हायकमांडवर सोडली आहे.
D. K. Shivakumar
D. K. ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : माझ्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या. काँग्रेसमध्ये माझ्यासह १३५ आमदार आहेत. आम्ही १३५ आमदार सोनिया गांधींना समर्पित केले आहेत. त्या काय निर्णय घेतात ते पाहूया, असे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, शिवकुमार यांनी आज आपला ६२ वा वाढदिवस साजरा केला. कॉंग्रेसचा विजय हीच जनतेने आपणांस दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचे त्यांनी सांगितले. (135 MLAs including me dedicated to Sonia Gandhi : D. K. Shivakumar)

सदाशिवनगरमध्ये आज (ता. १५ मे) पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिवकुमार (D. K. Shivakumar) म्हणाले की, ‘आम्ही कॉंग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडीचे अधिकार पक्षश्रेष्ठींना देण्याचा एक ओळीचा ठराव मंजूर केला आहे. मी कोणाच्या नंबरबद्दल बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांची निवड हायकमांडवर सोडली आहे.

D. K. Shivakumar
Indapur Politic's : हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यातील कारखान्यांविरोधात आप्पासाहेब जगदाळेंनी उगारले आंदोलनास्त्र

आज माझा वाढदिवस आहे. गुरुची भेट घ्यायची आहे. माझा खासगी कार्यक्रम संपल्यानंतर मी दिल्लीला जाईन. पत्रकार परिषदेनंतर शिवकुमार तुमकूर येथील नूनविनकेरे अजय्या मठात गेले होते. तेथून आल्यानंतर ते विशेष विमानाने दिल्लीला रवाना होतील. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला रवाना झाले असून ते आज संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

D. K. Shivakumar
Ajit Pawar On Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काय असणार?; अजित पवारांनी चार शब्दांतच सांगून टाकला....

कॉंग्रेसचा विजय हीच वाढदिवसाची भेट

शिवकुमार यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या भेटीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दणदणीत विजय ही जनतेने मला दिलेली सर्वोत्तम वाढदिवसाची भेट आहे. माझे जीवन कर्नाटकातील लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहे. आठ वेळा आमदार असलेले शिवकुमार यांनी सोमवारी आपला ६२ वा वाढदिवस साजरा केला. "माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, कर्नाटकच्या जनतेने मला शक्य तितकी सर्वोत्तम वाढदिवसाची भेट दिली. त्यांच्या हार्दिक शुभेच्छांसाठी माझ्या काँग्रेस परिवाराचे आभार, असे ते म्हणाले.

D. K. Shivakumar
Ajit Pawar On Tekwade : अशोक टेकवडेंच्या भाजप प्रवेशाचे अजितदादांनी सांगितले कारण : ‘मध्यंतरी त्यांच्याकडे इन्कम टॅक्सचा...’

शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्याशी तीव्र स्पर्धा सुरू आहे . कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाने रविवारी झालेल्या बैठकीत एआयसीसी अध्यक्ष एम मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार देणारा ठराव एकमताने मंजूर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com