Karnataka Politics : पक्षांतर करत राहिलेले सिद्धरमय्या अन् पक्षाशी निष्ठावंत शिवकुमार; मुख्यमंत्रीपदासाठी दोघांची दावेदारी मजबूत का?

Karnataka CM Post : दोन्ही दावेदारांची काय आहे कच्चे पक्के दुवे...
D K Shivkumar : siddaramaiah
D K Shivkumar : siddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबत काँग्रेसला अजूनही निश्चित निर्णय घेता आलेला नाही. मात्र आज मुख्यमंत्री कोण हे ठरणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी प्रामुख्याने दोन नावे सर्वात पुढे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा आहे. आताच्या निवडणुकीतील यशातील वाटा आणि बहुतांश आमदाराचं कल पाहता, शिवकुमार यांचं नाव आघाडीवर आहे.

D K Shivkumar : siddaramaiah
Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

शिवकुमारांचं नाव आघाडीवर का?

निष्ठा -

60 वर्षीय शिवकुमार हे तरुणपणापासूनच काँग्रेसमध्ये आहेत. याशिवाय ते गांधी घराण्याशीही निष्ठावान राहिले आहेत. नुकतेच त्यांनी सांगितले होते की, मला भाजपमध्ये येण्याच्या अनेक ऑफर आल्या, पण त्यांनी नकार दिला. कॉलेजमध्ये त्यांनी एनएसयूआयमध्ये प्रवेश घेतला. यानंतर ते ७ वेळा आमदार झाले.

कर्नाटकात काँग्रेस वाढवली -

2020 मध्ये शिवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख बनले. राज्यात काँग्रेसला नव्याने आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या रणनीती आणि नेतृत्वामुळे कर्नाटकात काँग्रेस मजबूत झाली.

आर्थिक प्रस्थ -

शिवकुमार हे काँग्रेसचे आर्थिकदृष्ट्याही मोठे मदतनीस असल्याचे बोलले जाते. एका मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटक आणि अनेक राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेला त्यांनी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली. यासोबतच त्यांनी विधानसभा निवडणुकीतही पक्षासाठी निधी दिल्याचे बोलले जाते.

संकटमोचक आणि समुदायाचा पाठिंबा -

अलीकडच्या काळात शिवकुमार हे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून समोर आले आहेत. कर्नाटक सोडून इतर अनेक राज्यात काँग्रेसला अडचणीतून बाहेर काढण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. काँग्रेसचे ते संकटमोचक आहेत. समर्थनाच्या बाबतीत शिवकुमार वोक्कलिंगा समुदायाचा मोठा पाठिंबा आहे.

अनुभव-

डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. यासोबतच त्यांना संघटनेचा चांगला तारणहार म्हणूनही ओळखलं जातं. तसेच सिद्धरामय्या यांच्याशी तुलना केल्यास त्यांचे वयही कमी आहे. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारमध्येही ते मंत्री राहिले आहेत.

D K Shivkumar : siddaramaiah
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाचा नवा अंक; ठाकरे गटाचं दबावतंत्र तर शिंदेंचीही कायदेशीर चाचपणी!

सिद्धरामय्या -

वय आणि अनुभवात शिवकुमार यांच्याही पुढे असले तरी सिद्धरामय्या यांचाही मुख्यमंत्रीपदाचा दावा कमकुवत नाही. 1983 मध्ये राजकारणाला सुरुवात करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी भारतीय लोकदल पक्षाच्या तिकिटावर पहिली निवडणूक लढवली. या पक्षाची स्थापना १९७४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला विरोध म्हणून करण्यात आली होती. कालांतराने, ते कुरुबा ओबीसी नेता म्हणून प्रस्थापित झाले. मागासवर्गीय, मुस्लिम आणि दलित मते मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले.

भारतीय लोकदल पक्षानंतर ते जनता पक्षाचा भाग बनले . जनता दलातील विभाजनानंतर जनता दल (धर्मनिरपेक्ष) ते काही काळ कार्यरत राहिले. 2006 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. नंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आणि 2013 मध्ये कर्नाटक राज्यात 122 जागा जिंकून आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.

यात एक विशेष म्हणजे कर्नाटकच्या राजकारणात मोठे नाव असूनही अलीकडल काळात सिद्धरामय्या यांना स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधता आले नाही. या निवडणुकीत त्यांनी वरूणा मतदारसंघातून निवडणूक लढवली ते विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com