
Mumbai News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर दबावतंत्र वापरायला सुरूवात केली, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही अॅक्शन मोडवर आली आहे. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : New Issue of Power Struggle)
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदेशीर सल्ले घ्यायला सुरूवात केली आहे. ठाकरे गटाने काल उपाध्यक्षांना निवेदन दिल्यानंतर दोन्ही गट कायेदशीर सल्ला मसलत करत आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे, असे या बैठकीत सांगण्यात आलं. आणि हा निकाल लोकांपर्यंत, गावागावात पोहचायला हवं, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असं ही सांगण्यात आलं.
उद्धव ठाकरे गटाची (Uddhav Thackeray Group) दुसरी योजना म्हणजे, कायदेशीरदृषट्या कशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना आणि एकनाथ शिंदे यांना कोंडीत कायद्याच्या कचाट्यात पकडता येईल. विधानसभा सचिव आणि आणि अध्यक्ष यांना एका पत्राद्वारे विनंती केली की, पंधरा दिवसात याचा निर्णय घ्या, एकप्रकारे विधानसभा अध्यक्षांवर आणि सचिवांवर दबावतंत्र वापरले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडूनही लीगल टीम घेऊन लढाईसाठी सज्ज आहेत, असं दिसत आहे. कायदेशीर सल्ल्यानुसारच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून पावलं टाकलं जाणार आहे. उद्धव ठाकरे त्यांचे आमदार कायद्याच्या कोंडीत सापडतात का याचीही चाचपणी शिंदे गट करणार हे निश्चित आहे. आता या कायदेशीर लढाईत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.