Krishna Kumari Rai : शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा दोन दिवसांतच आमदारकीचा राजीनामा

Sikkim CM Prem Singh Tamang wife Krishna Kumari Rai resigns : प्रेमसिंह तमांग यांनी सोमवारी सिक्कीमच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या पत्नीही या निवडणुकीत निवडून आल्या आहेत.
Prem Singh Tamang, Krishna Kumari Rai
Prem Singh Tamang, Krishna Kumari RaiSarkarnama

New Delhi : सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सिक्कीमची सत्ता काबीज केली. पक्षाचे प्रमुख प्रेमसिंह तमांग यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. पण त्यानंतर दोन दिवसांतच त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

कृष्णा कुमारी राय यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे गुरूवारी पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा राजीनामा मंजूर कला आहे. राय यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. नामची-सिंगिथंग या मतदारसंघातून त्या पाच हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

सिक्कीम क्रांती मोर्चाला निवडणुकीत 32 पैकी 31 जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला आहे. त्यामुळे राय यांच्या राजीनाम्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत राय यांनीच पत्राद्वारे आपल्या राजीनाम्याबाबत खुलासा केला आहे. पक्षाने मी निवडणूक लढावी, असा निर्णय घेतला होता. त्याचा सन्मान करण्यासाठी निवडणूक लढवली, असे राय यांनी म्हटले आहे.

खूप जड मनाने मी राजीनामा दिला आहे. मी एवढ्या लवकर निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करेन, असा विचार केला नव्हता. मी राजकारणाला नेहमीच सामाजिक काम म्हणून पाहिले आहे. याच कारणामुळे मी राजकारणात प्रवेश केला. पण लोकांची सेवा करण्यासाठी कोणत्याही पदाची आवश्यकता नाही, यावर माझा विश्वास असल्याचेही राय यांनी पत्रात लिहिले आहे.

Prem Singh Tamang, Krishna Kumari Rai
Rahul Gandhi:राहुल गांधी राजीनामा देणार; वायनाडमधून प्रियांका लढणार?

मुख्यमंत्र्यांनीही पत्नीच्या राजीनाम्याचे समर्थन केले आहे. कृष्णा कुमारी यांचा राजीनामा पक्षाच्या सर्वसंमत निर्णयानुरूप होता. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या कामांना प्राधान्य दिले आहे. पक्षाच्या संसदीय समितीच्या आग्रहाखातर त्यांनी निवडणूक लढवली होती. मतदारसंघावर नवीन उमेदवार, कृष्णा राय आणि माझेही लक्ष असेल, असे तमांग यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com