डेहराडून : उत्तराखंड भाजपमध्ये लवकरच भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे (Congress) नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल (Govind Singh Kunjwal) यांनी येत्या पंधरा दिवसात भाजपचे (BJP) सहा आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला. राज्यात काँग्रेसची लाट असून काँग्रेसचचे सरकार स्थापन होणार असल्याचेही कुंजवाल यांनी सांगितले. मात्र, कुंजवाल यांच्या या दाव्याने भाजपच्या तंबूत मोठी खळबळ उडाली आहे.
उत्तराखंडच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे अनेक आमदार पक्षांतर करण्याच्या तयारी आहेत. अशावेळी काँग्रेस नेते गोविंद सिंह कुंजवाल यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. हे आमदार कोण आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तीन आमदार गढवाल मंडल येथील आणि तीन कुमाऊ येथील असल्याची माहिती आहे.
कुंजवाल यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली. राज्यातील भाजप सरकार हे निष्क्रिय असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. डबल इंजिनचे सरकार असूनही विकास होत नाही. राज्यातील जनतेच्या मूलभूत गरजाचीही पूर्ताता होत नाही. राज्यातील जनता काँग्रेसकडे मोठ्या अपेक्षने पाहत आहे. भाजपला धडा शिकवण्याच्या तयारीत राज्यातील जनता असल्याचे त्यांनी सांगितले.
बेरोजगारी, महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळेच जनता भाजपला धडा शिकवणार आहे. कोरोना काळात गरीबांना रोजी रोटीसाठी त्रस्त व्हावे लागले. त्यामुळे भाजपच्या विरोधात जनतेत आक्रोश आहे आणि म्हणून भाजपचे आमदार घाबरले आहेत. लोकांच्या नाराजीचा फटका बसण्याची भीती आमदारांना वाटत आहे. त्यामुळेच ते काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील सहा आमदार येत्या 15 दिवसात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे कुंजवाल यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.