
Delhi Politics News : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. तर अवैध स्थलांतरीतांचा मुद्दाही समोर आला आहे. या मुद्य्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आम आदमी पार्टीवर आरोपही केले आहेत.
भाजपा(BJP) नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पक्ष मुख्यालयात एका पत्रकारपरिषदेत म्हटले की, आम आदमी पार्टी बेकायदेशीररित्या राहत असलेल्या बांगलादेशींना बनावट आधारकार्ड आणि कागदपत्रांद्वारे दिल्लीत स्थायिक होण्या मदत करत आहे. दिल्ली पोलिसांनी काही बांगलादेशींना अटक केली होती आणि त्यांच्याकडून खोटे आधारकार्ड जप्त केले होते. त्यांच्याकडे जे खोटे आधारकार्ड आढळले त्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांचे सही शिक्के आहेत.
भाजप नेत्या स्मृती इराणी(Smriti Irani) यांनी रविवारी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. पत्रकारपरिषदेत त्यांनी म्हटले की, दिल्लीतील रोहिणी स्थित सेक्टर पाचमध्ये एका दुकानावर बनावट आधारकार्ड बनवली गेली आहेत. बेकायदेशीर बांगलादेशींसाठी या दुकानात आधारकार्ड बनवली गेली आहेत.
त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टीचा भयावह चेहरा समोर आला आहे. आम आदमी पार्टीच्या आमदारांचा शिक्का आणि पत्रासोबत 26 अपडेट आधार फॉर्म मिळाले आहेत. रिठाला आमदार मोहिंदर गोयल आणि बवाना येथील आमदार जय भगवान यांचे पत्र आणि शिक्का मिळाले आहे.
त्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टीचे(AAP) आमदार आणि स्टाफ मेंबर्सच्या चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे. परंतु कोणीही पोलिसांसमोर हजर झालेले नाही. तसेच त्यांनी सांगितले की, आरोपी रंजीत आपला सहकारी अफरोजच्या मदतीने बनावट जन्मप्रमाणपत्र बनवत होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.