Amit Shah News : '...म्हणून भाजपच्या इतिहासात 2024 या वर्षाला असणार विशेष महत्त्व' ; अमित शहांचं विधान!

BJP Amit Shah News : जाणून घ्या, केंद्रीय गृहमंत्री यांनी अमित शाह शिर्डीतील महाअधिवेशनात नेमकं काय सांगितलं
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

BJP Shirdi convention News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी शिर्डीत पार पडलेल्या भाजपच्या महाअधिवेशनात महाराष्ट्रातील नेत्यांसह पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि 2024 हे वर्ष कशाप्रकारे भाजपसाठी लाभदायक आणि महत्त्वपूर्ण राहिले हे देखील सांगितले.

अमित शाह(Amit Shah) म्हणाले, 'भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात 2024 हे वर्ष फार सुखद राहिलेलं आहे. 2024 मध्येच आमचे नेते मोदी सलग तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले. 2024 मध्येच आम्हाला हरियाणात सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. 2024 मध्येच आंध्र प्रदेशात पहिल्यांदाच एनडीए आघाडी विजयी झाली. '

2024 मध्येच पहिल्यांदा ओडिशामध्ये पूर्ण बहुमताने कमळाच्या फुलाचे सरकार बनले. 2024 मध्ये पुन्हा सिक्कीममध्ये एनडीएचा(NDA) विजय झाला आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात तिसऱ्यांदा आपल्याला जनादेश मिळालेला आहे. त्यामुळे 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वपूर्ण वर्ष राहील, जेव्हापण भाजपचा इतिहास लिहिला जाईल.'

Amit Shah
Amit Shah on Sharad Pawar : 'आता मी शरद पवारांना सांगतो...' म्हणत अमित शहांनी थेट 'ही' आकडेवारीच मांडली अन् लगावला टोला!

तसेच 'आपण थकणारे लोक नाहीत. आपण सर्वजण जाणतो, आपल्या पक्षाचा काम करण्याचा आधार आपलं संघटन असते. आपला निवडणूक जिंकण्याचा पाया आपलं मजबूत संघटन आहे. बुथवरील आपला योद्धाच आपलं सेनापती असतो. निवडणुकीमुळे महाराष्ट्रात संघटन पर्व जरा उशीराने सुरू झालं आहे. मी आताच बावनकुळेंना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ४० लाख सदस्य बनले आहेत, दीड कोटी बनवायचे आहेत. परंतु आज माझ्यासमोर कार्यकर्त्यांचा सागर बसलेला आहे, मी तुम्हाला हात जोडून विनंती करण्यास आलो आहे की, एकही बुथ असं राहलाय नको जिथे 250पेक्षा कमी सदस्य असेल अशी भाजपा बनवायची आहे.'' असं अमित शाह यांनी सांगितलं.

Amit Shah
Amit Shah : "खोटारडेपणा करून मुख्यमंत्री बनलेल्या..." शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

याशिवाय, ''याच वर्षांत मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह सर्वच महापालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व जिल्हा पंचायतींच्या निवडणुका येत आहेत. विरोधकांनाही एकही जागा बसण्यास मिळू नये, याची चिंता तुम्हा सर्वांना करायची आहे. विकासाची साखळी तेव्हाच संपूर्ण होते, जेव्हा पंचायत पासून पार्लमेंटपर्यंत तुम्ही भगवा फडकवाल, तेव्हाच विजय होतो नाहीतर नाही होत. पंचातीतही भाजपा, तहसील जिल्ह्यातही भाजपा(BJP), नगरपालिका अन् महानगरपालिकेतही भाजपा महाराष्ट्रातही भाजप आणि देशातही भाजप पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे विजयाचे सूत्रधार बनण्यासाठी, आज तुम्हाला बोलावलं गेलं आहे.'' असं अमित शाह म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com