
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) आज दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. ठाकरे सरकारच्या "डर्टी डझन" नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. दरम्यान दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव यांच्या कारवाईवर भाष्य केले. तसेच ठाकरे-गांधी परिवार आरोप देखील केले.
आजच्या पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, यशवंत जाधव यांच्या प्रकरणासाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहे. त्यासाठी अर्थमंत्री, कंपनी मंत्रालय, ईडी, आयकर अशा सर्वांच्या भेटी घेतल्या. जाधव यांच्या पत्नी आणि आमदार यामिनी जाधव यांनीही भ्रष्टाचार आणि मनी लॉंड्रिंग केले आहे.
या मनी लॉंड्रिंग प्रकरणात आयकर विभागाने यापूर्वीच प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी देखील ग्राह्य धरली आहे. अधिकृतरित्या बंद कंपनीतून जाधव परिवाराने १५ कोटी रुपये कॅश देऊन चेकमध्ये ती घेतली, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी मालमत्ता लपवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यासोबतच उद्धव ठाकरे यांनीही मे २०२० मध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरला. त्यात त्यांनी १९ बंगले लपवले मालमत्तेतून लपवले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या या बंगल्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
यावेळी सोमय्या यांनी उदयशंकर महावार हा ठाकरे यांचा हवाला ऑपरेटर आहे. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांचा हवाला ऑपरेशन हाच माणूस बघतो. मनपाचा फंड कलेक्टर यशवंत जाधव यांचाही हवालामार्फत पैसा याच व्यक्तीने वळवला असा आरोप त्यांनी केला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी एरआएच्या सदनिका हडपल्या आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.