नवऱ्याचं न ऐकणाऱ्या बायकांमुळं मुलं बिघडली!

सीबीएसई परीक्षेत यावर एक परिच्छेद देत प्रश्न विचारण्यात आले होते. लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
Womens in India

Womens in India

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या परीक्षेतील प्रश्नांवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा सोमवारी लोकसभेतही (Loksabha) उपस्थित करण्यात आला आहे. सरकारने जाहीर माफी मागण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी याबाबत लोकसभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

शनिवारी इयत्ता दहावीची इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. या पेपरमध्ये महिलांशी संबंधित एक परिच्छेत देण्यात आला होता. त्यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण यामध्ये देण्यात आलेली काही विधाने अत्यंत आक्षेपार्ह आहेत. याबाबत अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आजकाल महिला आपल्या पतीचे ऐकत नाहीत. त्यामुळे मुलं व नोकरांमधील बेशिस्तपणा वाढला आहे, अशी काही विधाने या परिच्छेदामध्ये आहेत.

<div class="paragraphs"><p>Womens in India</p></div>
आंबेडकरांना मिळाले दोन नवे भिडू; शिवसेना व काँग्रेसबाबत केलं मोठं विधान

विसाव्या शतकात मुलं कमी होण्यामागे महिलांचा विद्रोह कारणीभूत असल्याचेही यामध्ये म्हटले आहे. महिलांना मुकी मिळाल्याने मुलांवरील आई-वडिलांचा अधिकार संपुष्टात आला. आपल्या पतीचा मान राखल्यानंतरच एक आई आपल्यापेक्षा छोट्यांकडून सन्मान मिळवू शकते, अशा वाक्यांचा वापर या परिच्छेदात करण्यात आला आहे. हा मुद्दा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

सीबीएसई आणि सरकारने यावर माफी मागावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. 'अविश्वसनीय, आपण खरचं मुलांना असले शिक्षण देत आहोत? भाजपचे सरकार महिलांच्या विरोधातील या विचारांचे समर्थन करत आहे. अन्यथा सीबीएसई अभ्यासक्रमात याचा समावेशच केला नसता,' असं प्रियांका यांनी म्हटलं आहे.

युवकांची नैतिक शक्ती आणि भविष्य उध्वस्त करण्याचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) हे षडयंत्र आहे. सीबीएसईचे अनेक प्रश्न आतापर्यंत खूप कठीण राहिले आहेत, असं राहुल यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान (Dharmendra Pradhan) व सीबीएसईच्या अध्यक्षांना पक्ष लिहिलं आहे. चतुर्वेदी यांनी बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत सविस्तर खुलासा करून ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com