Sonia Gandhi News : राहुल गांधींवर भाजपचा वार; आईविषयी केला गंभीर आरोप, 1980 ची मतदारयादी काढली बाहेर

BJP’s Amit Malviya Accuses Sonia Gandhi of Early Voter Registration : सोनिया गांधी यांचे पहिल्यांदा पहिल्यांदा 1980 मध्ये मतदारयादीत नाव आले होते. त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या तीन वर्षे आधी हे घडलं, असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.
BJP leader Amit Malviya alleges Sonia Gandhi’s name appeared in voter list before she received Indian citizenship.
BJP leader Amit Malviya alleges Sonia Gandhi’s name appeared in voter list before she received Indian citizenship.Sarkarnama
Published on
Updated on

Citizenship and Voter List Controversy : देशात सध्या ‘वोट चोरी’चा मुद्दा गाजत असतानाच भाजपने काँग्रेस व पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींचे यांचे 1980 मध्येच मतदारयादीत नाव नोंदविण्यात आले होते. त्यावेळी त्या भारतीय नागरीकही नव्हत्या. 1983 मध्ये त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाल्याचा दावा भाजपने केला आहे.

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. सोनिया गांधींच्या मतदारयादीचा पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मालवीय यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी यांचा मतदार यादीशी असलेला संबंध निवडणूक कायद्याचे उल्लंघन आहे. कदाचित यामुळेच अपात्र आणि बेकायदेशीर मतदारांना नियमित करण्याचा प्रयत्न आणि SIR ला विरोध असेल.

सोनिया गांधी यांचे पहिल्यांदा पहिल्यांदा 1980 मध्ये मतदारयादीत नाव आले होते. त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या तीन वर्षे आधी हे घडलं. त्यावेळी त्या इटालियन नागरिक होत्या.. त्यावेळी गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी राहत होते. नवी दिल्ली मतदारसंघाच्या मतदारयादीत 1 जानेवारी 1980 ही पात्रता तारीख म्हणून सुधारणा करण्यात आली आणि सोनिया गांधी यांचे नाव मतदारयादीत घालण्यात आल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे.

BJP leader Amit Malviya alleges Sonia Gandhi’s name appeared in voter list before she received Indian citizenship.
Narendra Modi Vs Ajay Rai : सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये मोदींना पिछाडीवर टाकणाऱ्या अजय राय यांचा विजयी जल्लोष; 14 महिन्यांनी वाटली मिठाई

मतदार म्हणून नोंदणीसाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक असताना मतदारयादीतील ही नोंद कायद्याचे स्पष्ट उल्लंघन करणारी होती. गोंधळानंतर 1982 मध्ये त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आणि पुन्हा 1983 मध्ये त्यात मतदार झाल्या. नोंदणीसाठी पात्रता तारीख 1 जानेवारी 1983 होती. पण त्यांना 30 एप्रिल 1983 रोजी भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते, असेही मालवीय यांनी म्हटले आहे.

BJP leader Amit Malviya alleges Sonia Gandhi’s name appeared in voter list before she received Indian citizenship.
Election News : भाजपच्या उमेदवारासाठी सोनिया गांधींसह खर्गेंचे मतदान; प्रतिष्ठेच्या निवडणुकीने इतिहास घडवला...

नागरिक्तवाची मूलभूत अट पूर्ण न करताच सोनिया गांधी यांचे दोनवेळा मतदारयादीत नाव आले. पहिल्यांदा 1980 मध्ये इटालियन नागरिक म्हणून आणि 1983 मध्ये कायदेशीररित्या भारताचे नागरिक होण्याच्या काही महिने आधी. हा उघडपणे निवडणूक गैरव्यवहार नाही तर मग काय आहे, असा सवाल मालवीय यांनी केला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com