Congress News : कर्नाटकातून सोनिया गांधी जाणार राज्यसभेवर; सिद्धरामय्यांची विनंती; खर्गे यांची सूचना मान्य होणार?

राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे, त्यांना लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गांधी कुटुंबीयांस राज्यसभेवर जाणे आवश्यक आहे.
Sonia Gandhi
Sonia Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी या कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गांधींना नुकतीच तशी विनंती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही तशी सूचना त्यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकृता अस्वास्थ्यामुळे गांधी या लोकसभेची आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले जात आहे, तसेच राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सोनिया गांधी या कर्नाटकातून राज्यसभेवर जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (Sonia Gandhi will go to Rajya Sabha from Karnataka)

पुढील वर्षी म्हणजेच २ एप्रिल २०२४ रोजी कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेसचे तीन राज्यसभा सदस्य सय्यद नासीर हुसेन, डॉ. एल. हनुमंतय्या आणि जी. सी. चंद्रशेखर यांचा कार्यकाळ संपणार आहे. कर्नाटकात काँग्रेसचे १३५ सदस्य आहेत, त्यामुळे तीनही सदस्य पुन्हा निवडून येणे सहज शक्य आहे. एकूण चार जागांसाठी कर्नाटकात येत्या आठ महिन्यांत निवडणुका होणार आहेत. त्यावेळी सोनिया गांधी (Soniya Gandhi) या कर्नाटकातून राज्यसभेवर (Rajya Sabha) जाण्याची शक्यता आहे.

Sonia Gandhi
Supplementary Demands : पुरवणी मागण्या कधी मांडल्या जातात अन्‌ त्यात किती टक्के तरतूद असावी; बाळासाहेब थोरातांनी सांगितले संकेत

खासदार सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे, त्यांना लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गांधी कुटुंबीयांस राज्यसभेवर जाणे आवश्यक आहे.

दिल्लीतील दहा जनपथ हे निवास्थान राजीव गांधी विरोधी पक्षनेते असल्यापासून गांधी कुटुंबीयांकडे आहे. ते कायम ठेवण्यासाठी सोनिया गांधी यांना लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागणार आहे. पण, सोनिया गांधींची प्रकृती पाहता त्या राज्यसभला पसंती देण्याची शक्यता आहे. त्यांनी कर्नाटकातून राज्यसभेवर जाव्यात, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. तसेच, मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनियांना कर्नाटकातून राज्यसभा सदस्य होण्याचा सल्ला दिला आहे.

Sonia Gandhi
Assembly Session : फुटलेल्या आमदारांना सांभाळण्यासाठी निधीचा वापर ,अजितदादांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती; थोरातांची नाराजी

भाजपचे डावपेच हे नेहरू-गांधी घराण्यातील एकही सदस्य संसदेत नसावेत, असे आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून सोनिया यांच्यासाठी सुरक्षित कर्नाटकची निवड केल्याचे सूत्रांनी सांगितले. सोनिया यांच्यासोबत प्रियंका गांधीही राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे. त्या हिमाचल प्रदेशमधून संसदेत जाण्यास पसंती देतील, असे सूत्रांनी सांगितले.

Sonia Gandhi
Sanjay Shirsat on Ajitdada's CM: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदावर शिरसाटांचा गर्भित इशारा; ‘त्यामुळे पवारांच्या अडचणीत वाढतील; पण मुख्यमंत्री...’

दरम्यान, कर्नाटकातून निवडून देण्याच्या तीन जागांसाठी सोनिया गांधी, उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथे आणि कर्नाटकचे सय्यद नसीर हुसेन यांची नावे चर्चेत आहेत. यापूर्वीही एकदा सोनिया गांधी कर्नाटकातून निवडणूक लढवली आहे. त्यांनी १९९९ मध्ये बेल्लारीमधून निवडणूक लढवून जिंकली हेाती. दोन ठिकाणाहून निवडून आल्याने त्यांनी बेल्लारीचा राजीनामा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com