Supplementary Demands : पुरवणी मागण्या कधी मांडल्या जातात अन्‌ त्यात किती टक्के तरतूद असावी; बाळासाहेब थोरातांनी सांगितले संकेत

यापूर्वीच्या मागील पावसाळी अधिवेशनात २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या होत्या, तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या होत्या.
Ajit Pawar-Balasaheb Thorat
Ajit Pawar-Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अंदाजपत्रकात अंदाज न आलेल्या खर्चासाठी किंवा नव्याने वाढीव तरतूद करायची झाल्या किंवा अकल्पित तातडीची खर्च भागविण्यासाठी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. त्या पुरवणी मागण्यांमध्ये फक्त पाच ते दहा टक्के तरतूदी असाव्यात, असे संकेत आहेत, असे काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले. (When supplementary demands are raised & what percentage provision should be made; Balasaheb Thorat told rule)

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी असमान निधी वाटपावर भाष्य केले. तसेच, पुरवणी मागण्या आणि त्यातील तरतूद याबाबत स्पष्ट केले. ते म्हणाले की, सरकारने आता ४१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या आहेत. यापूर्वीच्या मागील पावसाळी अधिवेशनात २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या होत्या, तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या होत्या.

Ajit Pawar-Balasaheb Thorat
Assembly Session : फुटलेल्या आमदारांना सांभाळण्यासाठी निधीचा वापर ,अजितदादांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती; थोरातांची नाराजी

मागील आणि या वर्षीच्या पुरवणी मागण्यांचा विचार केला तर १ लाख २० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. आपण अर्थसंकल्प मांडतो. पण, एक लाख २० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडणे, हे फार शोभून दिसतंय, असं समजण्याचं कारण नाही, असा टोमणाही त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला.

Ajit Pawar-Balasaheb Thorat
Sanjay Shirsat on Ajitdada's CM: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदावर शिरसाटांचा गर्भित इशारा; ‘त्यामुळे पवारांच्या अडचणीत वाढतील; पण मुख्यमंत्री...’

थोरात म्हणाले की, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. पण, घडलेलं चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. या पुरवणी मागण्यांमधून राज्यातील शंभर आमदारांना सांभाळलं गेलं आहे. पण १८८ आमदारांची परिस्थिती अवघड आहे. भाजपच्या १०६ सदस्यांना किती निधी मिळाला आहे. शंभर लोकांना ६५ टक्के निधी मिळाला आहे, तर १८८ लोकांना केवळ ३५ टक्के निधी मिळालेला दिसत आहे. हा फरक राज्यातील नागरिकांवर अन्याय करणारा आहे. हा फरक तुमच्या लक्षात येईल, तेव्हा फार उशीर झालेला असेल.

Ajit Pawar-Balasaheb Thorat
Rohit Pawar On Protest: रोहित पवारांचे अजितदादांना अवघ्या काही मिनिटांत उत्तर : ‘दादा, धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख’

यापुढच्या काळात अजितदादांना भरपाई करता आली तर आनंदच आहे. नाही तर आम्हाला वाटा शोधाव्या लागतील. न्यायालयात जावे लागेल, असे सांगून आमच्यावर अन्याय होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले

Ajit Pawar-Balasaheb Thorat
Ajit Pawar In Assembly Session: अजितदादांनी रोहित पवारांचे कान टोचले; ‘अशा प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही’

शेलारांना टोला

आशीष शेलार हे भाजपचे वरिष्ठ व मुंबईचे अध्यक्ष असलेले आणि केवळ त्यांच्यावर अन्याय म्हणून मंत्री न बनलेले असे सदस्य आहेत. त्यांनी आता किमान आम्हाला तरी अडथळा करू नये, अशी अपेक्षाही मध्ये बोलणाऱ्या शेलारांना बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com