Special Session : भाजप मोठा डाव टाकणार, विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडणार?

Lok Sabha Introduce Delimitation Bill : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे घटनादुरुस्ती विधेयक नव्याने मांडण्याची तयारी सरकारने चालविली आहे.
Parliament special session latest news
Parliament special session latest newsSarkarnama
Published on
Updated on

BJP to introduce delimitation bill: मागील वेळी लोकसभेत मंजूर न होऊ शकलेले लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून पुन्हा मांडण्याच्या हालचाली मोदी सरकारच्या वतीने सुरू झाल्या आहेत.

या विधेयकाचे लोकसभेत २२ आणि राज्यसभेत आठ खासदार असलेल्या द्रमुकने समर्थन करण्याची चर्चा असून मोदी सरकारने काँग्रेसशीही संपर्क साधल्याची माहिती आहे, या विषयीचे वृत्त 'सकाळ'ने दिले आहे.

पावसाळी अधिवेशन येत्या १३ ऑगस्ट रोजी संपणार असून हे विधेयक मंजूर करण्यासाठी पुन्हा १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची सरकारची तयारी असल्याचे समजते.

२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणीकरणे सोयीचे व्हावे म्हणून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे घटनादुरुस्ती विधेयक नव्याने मांडण्याची तयारी सरकारने चालविली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेच्या जागा ५४३ वरुन ८५० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभेत आजच्या घडीला मोदी सरकारच्या बाजूने ३३२ खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदारही विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सरकारने दोन तृतीयांश बहुमत गाठल्यात जमा आहे.

या पार्श्वभूमीवर आज संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत या विधेयकाविषयी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसच्याच गोटातून देण्यात आली.

Parliament special session latest news
Ichalkaranji BJP : 22 कोटींच्या कामावरून भाजपमध्ये वाद! CM फडणवीसांसोबतची बैठक रद्द झाल्याने नवा प्लॅन, आता 'या' मंत्र्यावर मोठी जबाबदारी

अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही

संसदेचा पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तलली जात असताना किरेन रिजिजू यांनी ही शक्यता फेटाळली आहे. ते म्हणाले, विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची कोणतीही योजना नाही.

Parliament special session latest news
Ravindra Dhangekar Warns BJP : ऑडिओ क्लिपमुळे रवींद्र धंगेकर संतापले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना अल्टीमेटम! म्हणाले, ' रोज पोलखोल करू'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com