Ichalkaranji BJP : 22 कोटींच्या कामावरून भाजपमध्ये वाद! CM फडणवीसांसोबतची बैठक रद्द झाल्याने नवा प्लॅन, आता 'या' मंत्र्यावर मोठी जबाबदारी

Ichalkaranji BJP controversy over ₹22 crore project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच दोन्ही गटांतील मतभेद मिटवण्यासाठी दोन्ही गटांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बैठक कोल्हापूर किंवा मुंबई येथे होऊ शकते.
Ichalkaranji BJP Rift | Chandrakant Patil
Ichalkaranji BJP Rift | Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji News, 06 Aug : इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गटातील संघर्ष मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणारी बैठक जवळपास रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या वादावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच दोन्ही गटांतील मतभेद मिटवण्यासाठी दोन्ही गटांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बैठक कोल्हापूर किंवा मुंबई येथे होऊ शकते.

वादाचे नेमके कारण काय?

महापालिका आयुक्तांच्या बदलीची मागणी आणि सुमारे २२ कोटी रुपयांच्या स्वच्छता कामाच्या अंदाजपत्रकाच्या मंजुरीवरून भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गट आमनेसामने आले आहेत.

या वादामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सुरुवातीला हाळवणकर गट आक्रमक होता. मात्र आता आवाडे गटही आक्रमक भूमिका घेत असल्याने संघर्ष अधिक तीव्र होत आहे. या गटबाजीमुळे केवळ नगरसेवकच नव्हे, तर पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.

Ichalkaranji BJP Rift | Chandrakant Patil
Latur Congress : भाजप नगरसेवकांना डावलून थेट 28 विषयांना मंजूरी; सत्ताधारी काँग्रेसचा महापालिकेत नवा 'लातूर पॅटर्न'!

मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने नवा पर्याय

दोन्ही गटांनी आपल्या भूमिका मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना वेळ मिळू न शकल्याने हा पर्याय सध्या बाजूला पडल्याचे समजते. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही गटांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वीच हा वाद मिटवण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असल्याचे सांगितले जात आहे.

Ichalkaranji BJP Rift | Chandrakant Patil
Ravindra Dhangekar Warns BJP : ऑडिओ क्लिपमुळे रवींद्र धंगेकर संतापले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना अल्टीमेटम! म्हणाले, ' रोज पोलखोल करू'

एकमेकांना आव्हान देण्याची स्पर्धा

दरम्यान, दोन्ही गटांतील काही प्रमुख नेते एकमेकांना राजकीय आव्हान देण्याच्या भूमिकेत असल्याने समझोत्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस महापालिकेतील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे असून, सत्तेवरील पकड कायम ठेवण्यासाठी दोन्ही गटांकडून स्वतंत्र रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com