पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेतही मोठा राजकीय भूकंप; पंतप्रधानांच्या मुलानेच केली सुरूवात...

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आता राजकीय संकटाचाही सामना करावा लागणार आहे.
Sri Lanka PM Mahindra Rajpakshe, Sri Lanka crisis, Sri Lanka political crisis
Sri Lanka PM Mahindra Rajpakshe, Sri Lanka crisis, Sri Lanka political crisisSarkarnama
Published on
Updated on

कोलंबो : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी विरोधकांना चकवा देत रविवारी थेट संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींना करत राजकीय डाव टाकला होता. राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्याने पाकिस्तानमध्ये (Pakistan) मध्यावधी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर काही तासांतच श्रीलंकेतही (Sri Lanka) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आता राजकीय संकटाचाही सामना करावा लागणार आहे. (Sri Lanka crisis news)

भारताच्या (India) शेजारील दोन देशांमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून श्रीलंकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तू प्रचंड महागल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे (Mahindra Rajpakshe) यांनी एक एप्रिल रोजी देशात आणीबाणी जाहीर केली. तसेच सोशल मीडियावरही बंदी घातली आहे. तसेच काही शहरांमध्ये रविवारी संचारबंदीही लागू करण्यात आली होती.

Sri Lanka PM Mahindra Rajpakshe, Sri Lanka crisis, Sri Lanka political crisis
या दोन महिलांच्या बाणांनी इम्रान खान घायाळ; राजकीय संकटात दोघींचा दबदबा

अत्यंत अडचणीत सापडलेल्या राजपक्षे यांच्यासमोर आता राजकीय संकट उभे ठाकले आहे. रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील (Cabinet) सर्व मंत्र्यांनी एकाचवेळी राजीनामा दिला आहे. एका पत्रावर सर्वांनी स्वाक्षरी करत पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवला आहे. याची सुरूवात पंतप्रधानांच्या मुलानेच केली होती. त्यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. हे राजीनामे सध्या पंतप्रधानांकडे असून राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्याकडे सोपवतील. पण पंतप्रधान राजपक्षे आपला राजीनामा देण्याची तसेच लगेच नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची घाई करणार नाहीत, अशी चर्चा आहे.

पंतप्रधानांचा मोठा मुलगा नमल राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे युवक आणि क्रीडा मंत्रालय होतं. त्यांनी आपल्या वडिलांच्या सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयावर उघडपणे टीका केली आहे. पंतप्रधानांवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. देशातील खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर आवश्यक वस्तुंचा तुटवडा आणि महागाई वाढल्याने मोठं संकट आलं आहे. नागरिकांना या वस्तु खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगामध्ये उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com