

राज्य सरकारने दहावीच्या परीक्षापद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे.
तृतीय भाषेचे गुण आता एकूण गुणांमध्ये धरले जाणार नाहीत.
त्या विषयासाठी विद्यार्थ्यांना फक्त ग्रेड देण्यात येणार आहे.
Karnataka education policy News : कर्नाटक राज्य सरकारने दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षापद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला असून, तृतीय भाषेच्या (हिंदी किंवा इतर भाषा) गुणांना आता एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. त्याऐवजी त्या विषयासाठी केवळ ‘श्रेणी’ (ग्रेड) देण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी ही अधिकृत घोषणा केली.
गेल्या काही दिवसांपासून विविध कन्नड समर्थक संघटनांनी दहावी परीक्षेत हिंदी सक्ती करू नये, तसेच त्या विषयाचे गुण अंतिम गुणपत्रिकेत धरू नयेत, अशी मागणी केली होती. शुक्रवारी (ता. २७) सकाळी या संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्री मधु बंगारप्पा यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सल्लामसलत करून सरकारने हा निर्णय घेतला.
बंगारप्पा म्हणाले की, नव्या नियमांनुसार तृतीय भाषेचे गुण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत धरले जाणार नाहीत. या वर्षापासून राज्य अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही. विद्यार्थी तिसऱ्या भाषेची परीक्षा देतील; परंतु त्या भाषेचे १०० गुण मोजले जाणार नाहीत. तिसऱ्या भाषेसाठी ए, बी, सी, डी अशी ग्रेड देऊ. हा नियम सीबीएसई आणि आयसीएसई शाळांना हिंदीसह तृतीय भाषेला आता गुण नाही,फक्त ग्रेड लागू होत नाही, कारण त्या राज्य अभ्यासक्रमांतर्गत येत नाहीत.
भाषा धोरणातील बदलाचे संकेत
राज्यात अभ्यासक्रमात लागू सक्तीविरोधातील वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कन्नड भाषेला प्राधान्य देणे आणि विद्यार्थ्यांवर इतर भाषेचा अतिरिक्त ताण टाळणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. तृतीय भाषा म्हणून हिंदीऐवजी इतर कोणतीही भाषा निवडली तरी हा नियम लागू राहील.
पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या निर्णयावर विद्यार्थी व पालकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यामुळे ताण कमी झाल्याचे स्वागत केले आहे, तर काहींनी याचा भाषा शिक्षणावर विपरीत परिणाम होईल का, अशी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, कन्नड समर्थक संघटनांनी सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.
गुणसंख्या ६२५ वरून ५२५
आतापर्यंत दहावी परीक्षा ६२५ गुणांची होत होती. हिंदी विषयाचे १०० गुण वगळल्याने आता एकूण गुणसंख्या ५२५ इतकी राहणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी होईल, असा सरकारचा दावा आहे.
1. दहावीच्या परीक्षेत काय बदल झाला आहे?
तृतीय भाषेचे गुण आता एकूण गुणांमध्ये धरले जाणार नाहीत.
2. तृतीय भाषेसाठी काय दिले जाईल?
त्या विषयासाठी फक्त ग्रेड दिली जाईल.
3. हा निर्णय कोणाने जाहीर केला?
शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी ही घोषणा केली.
4. विद्यार्थ्यांना याचा फायदा काय होईल?
तृतीय भाषेचा ताण कमी होऊन निकालावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
5. हा नियम कधीपासून लागू होणार आहे?
सरकारच्या पुढील शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.