Karnataka Assembly Session : अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांच्या नाराजीचा स्फोट; मंत्र्यांकडून उत्तर न मिळाल्याने सभागृहातून वॉकआउट अन् निलंबनाचा आदेश

officers suspends over assembly speaker anger : विधानसभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने वाद झाला. यावरून थेट सभाध्यक्षांनीच सभागृह स्थगित करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Karnataka assembly session
Karnataka assembly session sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटक विधानसभेत मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी संताप व्यक्त करत वॉकआउट केला.

  2. या घटनेनंतर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

  3. सत्ताधारी पक्षाने पुढील सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिले आहे.

Karnataka politics : विधानसभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याबद्दल सभाध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृह स्थगित करून बाहेर पडण्याची दुर्मीळ घटना सोमवारी (ता. १६) घडली. या नाराजीमुळे अखेर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. तर या घटनेनंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सभापतींची समजूत काढत मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर देतील असे आश्वासन दिले आहे. ही घटना कर्नाटक सरकारच्या अधिवेशानदरम्यान घडली असून सभाध्यक्ष खादर यांच्या नाराजीमुळे खळबळ उडाली.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून उत्तर दिले जात नसल्याबद्दल खादर यांनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी ‘सरकारला अनेकदा सूचना केल्या. मंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अशा परिस्थितीत सभागृह कसे चालवायचे,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर का दिले जात नाही, याचे स्पष्टीकरण मंत्र्यांनी देईपर्यंत सभागृह चालवणार नाही,’ असे सांगत त्यांनी सभागृह स्थगित केले आणि पीठावरून बाहेर पडले.

सभापतींच्या या अचानक निर्णयामुळे सभागृहातील सदस्यांना आश्चर्य आणि धक्का बसला. यापूर्वी माजी सभापती रमेश कुमार यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगितले जाते. खादर सभाध्यक्ष झाल्यानंतर मंत्र्यांनी प्रश्नांना उत्तर न दिल्यामुळे त्यांनी प्रथमच सभागृह स्थगित केले.

Karnataka assembly session
Siddaramaiah Shivakumar clash : शिवकुमार कार्यक्रम सोडून गेले, सिध्दरामय्या संतापले अन्..; नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने खळबळ

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लेखी उत्तर देण्याच्या प्रश्नांचा उल्लेख करताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले की, आज लेखी उत्तर द्यायच्या २८३ पैकी ८४ प्रश्नांना उत्तर दिले आहेत. ज्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारवर टीका करत, ‘दररोज अशीच परिस्थिती असते. आमच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. आपण आधीच चार वेळा सूचना दिल्या आहेत. सरकारने उत्तर द्यायला हवे,’ असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.

त्यावर सभापती खादर यांनी सरकारला फटकारत सांगितले, ‘विधानसभा मंत्र्यांसाठी नाही, तर आमदारांसाठी आहे. आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात येतात. सर्व प्रश्नांना सभागृहात उत्तर देणे शक्य नसले तरी उर्वरित प्रश्नांना सरकारने लेखी उत्तर देणे आवश्यक आहे. उत्तरच मिळाले नाही तर आमदार सभागृहात का येतील?’ यानंतर, ‘सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर का दिले जात नाही, याचे स्पष्टीकरण मंत्र्यांनी द्यावे, तोपर्यंत सभागृह चालवणार नाही,’ असे सांगत त्यांनी सभागृह स्थगित केले.

...अन् सभाध्यक्षांची मनधरणी

नंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सभापतींची समजूत काढल्यानंतर खादर यांनी दुपारी १.३० वाजता पुन्हा सभागृहाची बैठक बोलावली. ‘सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळावे, यासाठीच सभागृह स्थगित केले होते. मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे सांगत त्यांनी सभागृह भोजनावकाशासाठी स्थगित केले.

Karnataka assembly session
CM Change politics : काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच? शिवकुमारांनी निशाणा साधलाच? म्हणाले, 'थोडा संयम बाळगा, उत्तर देईन'

FAQs :

1. सभाध्यक्षांनी वॉकआउट का केला?
मंत्र्यांकडून प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात नव्हती.

2. कोणावर कारवाई झाली?
तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

3. ही घटना कुठे घडली?
कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान ही घटना घडली.

4. सरकारने काय आश्वासन दिले?
मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी सर्व प्रश्नांना उत्तरे देतील असे सांगितले.

5. या घटनेचा परिणाम काय झाला?
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनावर दबाव वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com