Uttar Pradesh News : वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे या दोघांविरूद्ध उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर या ठिकाणी 'सनातन धर्म' विषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता उदयनिधी आणि प्रियांक खर्गे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Latest Marathi News)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्यावरून उत्तर प्रदेशातील संताप काही केल्या थांबत नाही. या दोघांविरुद्ध आता उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ वकील हर्ष गुप्ता आणि राम सिंह लोधी यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करत रामपूर येथे हा एफआयआर दाखल केला आहे.
बार असोसिएशन रामपूरचे माजी अध्यक्ष रामसिंग लोधी आणि माजी सरचिटणीस हर्ष गुप्ता यांनी मंगळवारी पोलिस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांना एक अर्ज दिला. यामध्ये त्यांनी स्टॅलिन आणि प्रियांक खर्गे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. रामपूरचे एसपी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, "दोन्ही नेत्यांविरुद्ध कलम 153A, 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्ष गुप्ता म्हणाले, "4 सप्टेंबर 2023 रोजी एका वृत्तपत्राने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त विधान प्रकाशित केले होते. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली. दुसऱ्या दिवशी कर्नाटक सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियंका खर्गे यांनीही उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.