भाजप सोडणाऱ्या माजी मंत्र्यांवर दगडफेक; खासदार मुलगी पक्षाविरोधात आक्रमक

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून खरा सामना भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये आहे.
Stones pelted on Swami Prasad Mauryas convoy
Stones pelted on Swami Prasad Mauryas convoySarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक (UP Election 2022) आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून खरा सामना भाजप (BJP) आणि समाजवादी पक्षामध्ये (SP) आहे. सतत शाब्दीक चकमक झडत असताना आता भाजप सोडणाऱ्या माजी मंत्र्याच्या वाहनांच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. ही दगडफेक भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील माजी मंत्री व समाजवादी पक्षाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याबाबतीत ही घटना घडली आहे. दगडफेकीमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या असून मोठे नुकसान झाले आहे. मौर्य यांची मुलगी संघमित्रा मौर्य (Sanghmitra Maurya) भाजपच्या खासदार आहे. वडिलांनी निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकला. पण संघमित्रा या भाजपमध्ये आहेत. पण वडिलांवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी थेट भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले आहेत.

Stones pelted on Swami Prasad Mauryas convoy
सुपर मार्केटबाहेर रांगेत उभा असतानाच भारतीय विद्यार्थ्यावर काळ कोसळला!

स्वामी प्रसाद मौर्य यांचा ताफा कुशीनगरमधून जात असताना अचानक दगडफेक करण्यात आली. जवळपास सहा-सात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मौर्य हे सपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले होते. खलवा पट्टी गांवात ही घटना घडली असून सपाच्या कार्यकर्तेही भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. संघमित्रा मौर्य यांनी भाजपविरोधात आता उघडपणे आघाडी उघडली आहे. त्यांनी वडिलांविरोधात प्रचार करणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

Stones pelted on Swami Prasad Mauryas convoy
काहीही करा पण कीवमधून आजच बाहेर पडा; भारतीय दुतावासानं चुकवला काळजाचा ठोका

घटनेनंतर मौर्य यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. समर्थकांनी गोडरिया बाजारात रस्ता अडवून धरला होता. यावेळी स्वामी प्रसाद मौर्य व संघमित्रा याही दाखल झाल्या. त्या म्हणाल्या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी वडिलांच्या ताफ्यावर हल्ला केला. रस्त्यावर हे दिसतच आहे. भाजप शांती आणि दंगामुक्त राज्याची गोष्ट करत आहे. आज त्यांच्याच उमेदवाराने वडिलांवर हल्ला केला. आम्हाला घेरण्यात आले होते. पण पोलिसांनी आम्हाला वाचवलं असा दावाही संघमित्रा यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com