Central Government On Medical Colleges Recognition: देशभरातील मेडीकल महाविद्यालयांवर केंद्र सरकारच्या (Central Government) रडारवर आहेत. यासंदर्भात मोठी कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारने या कारवाईत तब्बल 40 वैद्यकीय महाविद्यालयांनी मान्यता रद्द केली आहे. इतकेच नाही तर आणखीही 150 वैद्यकीय महाविद्यालयांवर देखरेखेखाली घेऊन त्यांच्यावर वचक ठेवण्यात येणार आहे. यामुळे या महाविद्यालयांवरही कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
संबंधित या वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये काही अनियमितता व व्यवस्थापनात त्रुटी आढळून आल्याने, केंद्र सरकारकडून कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय समिती यूजी बोर्डाकूडून (UG Bord) ही तपासणी करण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्दबातल करण्यात आली. या महाविद्यालायातील सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV), आधार-लिंक्ड बायोमेट्रीक (Adhaar Link) उपस्थिती विभाग भूमिका यात काही त्रुटी आढळल्याने, ही मोठी कारवाई केलेली आहे.
सरकारने एकूण 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द करण्यात आली. गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील महाविद्यालयांचा यात समावेश आहे. तसेच, इतरही 150 महाविद्यालायांवरही सरकारची करडी नजर असणार आहे. या ही महाविद्यालयात अनियमितता त्या त्रुटी आढळल्यास त्यांच्यावरही होण्याची दाट शक्यता आहे.
ही कारवाई झाली असली तरी, या वैद्यकीय महाविद्यालयांना या कारवाईविरोधात दाद मागण्याचा, अपील करण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे महाविद्यालये दाद मागू शकतात. असे असले तरी संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसंदर्भात सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.